करमाळा तालुक्यातील युवकाची उंच भरारी ; सतरा हजार फुटावर फडकवला भगवा
करमाळा समाचार
इंडियन हिमालया सेंटर फॉर अडवेंचर अँड इको टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने सिक्कीम येथे पार पडलेल्या १३ व्या बेसिक माऊंटरिंग कोर्स मध्ये दिलमेश्वरचे (dilmeshvar) तसेच करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे(karmala ycm) माजी विद्यार्थी व शिवक्रांती क्रिकेट (shivakranti) संघाचा खेळाडु गिर्यारोहक स्वप्निल दिलीप मोरे आणि पुणे येथील मावळ तालुक्यातील गिर्यारोहक सुधीर दत्तात्रय मोकाशी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.


याकोर्सचा कालावधी ४ मार्च ते ३१ मार्च होता. या कोर्समध्ये, महाराष्ट्र(maharashtra), छत्तीसगड(chhattisagarh), तेलंगणा(telngana), दिल्ली(delhi), कर्नाटक(karnataka), हिमाचल प्रदेश(himachalpradesh), आसाम (aasam), आंध्र प्रदेश( andhra pradesh) या राज्यांतून एकूण २८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
एकूण २८ दिवसांच्या खडतर प्रशिक्षनात स्वप्नील आणि सुधीर यांनी सिक्किम मधील माऊंट ए एल डी या १७१७९ फूट उंचीच्या शिखरावरती तिरंगा फडकला. सतत होणारी हिमवृष्टी, बदलते हवामान, ऑक्सिजनची कमतरता या सर्वांवर मात करून त्यांनी हे यश संपादन केले.
यागिर्यारोहनातील प्रशिक्षणात अनेक तंत्रे व आपत्कालीन स्थितील बचावात्मक तंत्रे, रॅपलिंग क्लाइंबिंग, झूमरिंग, स्पोर्ट्स वॅल क्लाइंबिंग, नाईट ट्रेकिंग , रूट ओपनिंग, इत्यादींचे त्यांनी प्रशिक्षण घेतले उत्कृष्ट टीम लीडर सहज कुशन गुणांमुळे त्यांना त्यांच्या टीमला सर्वोत्कृष्ट टीम म्हणून देखील पुरस्कार मिळाला. या प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रशिक्षक म्हणून माउंट एव्हरेस्टवीर काजी शेरपा, माऊंट एव्हरेस्ट वीर श्री. आनंद, इंस्ट्रक्टर आसल राय, चंदन अधिकारी इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.