करमाळासोलापूर जिल्हा

कर्तबगारीतून उंची गाठणारा नेता – आमदार संजयमामा शिंदे वाढदिवस विशेष

करमाळा समाचार 


खरंतर मामांबद्दल बोलताना शब्दांनाही कोडं पडतं परंतु असं म्हणतात ना कच्चा मुँह बच्चा मुँह लेकिन सच्चा मुँह म्हणून हा एक प्रयत्न… समाजकारण आणि राजकारण मनापासून इच्छा असेल तर मग स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी तडफडणारं असावे लागतं. समाजाच आपण काही देणे लागतो हे भावविश्व मामांनी कायम जागृत ठेवलं पदासाठी राजकारण नी समाजकारण करणारे हजारो असतात, पण गुणवत्तेच्या राजकारणामुळे पद मिळणारी माणसे हेच खरे नेते असतात.

आयुष्यभर पैशाचं झाड लावणारा अस्सल राजकारणी असत नाही आणि झालाच तर फार काळ टिकत नाही. टिकतो तो माणसांचं, कार्यकर्त्याचे गावोगावी शहरोशहरी गल्लोगल्ली अनुयायाचं जाळ निर्माण करणारा आज तरी मामांच्या उंचीचा न खुबीचा आणि गुणवत्तेचा राजकीय नेता जिल्ह्यामध्ये नाही कारण जिल्हाध्यक्ष म्हणून केलेलं काम असो वा आमदार म्हणून केलेलं काम त्या कामाचा विकासाचा ट्रेडमार्क ठरेल एवढं प्रचंड मोठं काम मामांच्या हातून झाले आहे.

आमदारकीच्या काळात 100 ते 150 दिवसच ते पद जनतेसाठी खऱ्या अर्थाने जनतेसाठी वापरता आलं कारण राष्ट्रपती राजवट असो वा कोरोना सारखं महामारीचं संकट पण काळजी नाही. कारण मागण्यासाठी काही शिल्लक राहणार नाही. एवढं सोन्याचा पिंपळ या तालुक्याला मिळालेय खरं तर आमची पिढी खूप भाग्यवान आहे. कारण कर्तबगारीतून उंची गाठणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या भुमीवरती साम्राज्य नको, स्वर्गातलं सुख नको ना ही पुनर्जन्म नको मामांचा कार्यकर्ता ही ओळख मिळाली आणि आमचं सोनं झालं.

………..राजेंद्र बाबर, हिंगणी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE