E-Paperक्राईममोहोळसोलापूर जिल्हा

बोपले शाळेतील चोरीतील आरोपी चोवीस तासात जेरबंद ; मोहोळ पोलिसांची कारवाई

समाचार – मोहोळ 

बोपले तालुका मोहोळ येथे 15 नोव्हेंबर सकाळी सात पूर्वी शाळेतील लॅपटॉप, एलईडी टीव्ही व इतर साहित्य असे एकूण 73 हजार रुपयांची चोरी करून चोर फरार झाले होते. या सर्वांना पकडण्यात मोहोळच्या पोलिसांना यश आले आहे. यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करून चार जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

रणजीत मानाजी जाधव (वय 21), प्रशांत ज्ञानेश्वर भोसले (वय 20), पेनूर ता. मोहोळ, सौरव सुधाकर करंडे (वय20), अक्षय धनाजी वाघमारे (वय 21) दोघे रा. बोपले ता. मोहोळ जिल्हा सोलापूर चौघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोपले ता. मोहोळ येथील शाळेतील शिक्षक दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी शाळा सुटल्यानंतर आपापल्या रूमला कुलूप लावून निघून गेले होते. तर 15 नोव्हेंबर रोजी गावचे सरपंच सुक्षण ढेरे यांनी शाळेच्या शिक्षकांना फोन करून सांगितले की शाळेची चोरी झाली आहे. या वेळी जाऊन पाहणी केली असता शाळेच्या दाराला कुलूप नव्हते. शाळेच्या रूम नंबर 2 मधून 1 लॅपटॉप व 1 प्रिंटर नव्हते रूम नंबर तीन चार सहा मधील 3 एलईडी टीव्ही नसल्याचे दिसून आले होते. असे सर्व साहित्य एकूण 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरी दि 17 रोजी दाखल गुन्हे तीन आरोपी हे मौजे पेनूर तालुका मोहोळ व बोपले तालुका मोहोळ येथे आहेत असे गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाणे कडील डीबीचे पथक आरोपी शोधणे कामी रवाना झाले. यावेळी पथकाने सापळा रचत रणजीत जाधव यासह चार आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, सो. मा. अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, सो. मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील, मोहोळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार माने, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस नाईक घोळवे, पोलीस शिपाई सिद्धनाथ मोरे, महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर यांनी केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE