एसटी आरक्षणासाठी धनगर बांधव आग्रही ; 11 दिवसापासुन सुरु आहे उपोषण
करमाळा समाचार
धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे म्हणून गेली अकरा दिवस झाले धनगर संघर्ष युद्धा प्रकाश वाघमोडे पाटील हे बारामती ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी बारामती याठिकाणी जाऊन पाठिंबा दिला.
करमाळा तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळाल्या शिवाय उपोषण सोडणार नाही असा निर्धार उपोषणकर्ते श्री प्रकाश वाघमोडे पाटील यांनी केला आहे. करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा धनगर आरक्षणासाठी तीव्र स्वरूपाचा लढा उभा केला जाईल असा इशारा आण्णासाहेब सुपनवर यांनी दिला.