कानगुडे कुटुंबावर दुखा:चा डोंगर ; कर्जत तालुका शोकसागरात
करमाळा समाचार
राशीन तालुका कर्जत येथील राष्ट्रवादीचे नेते शामभाऊ कानगुडे व माजी सभापती अश्विनी कानगुडे यांचा एकुलता एक मुलगा ओम कानगुडे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. कर्जत तालुक्यात शोक व्यक्त होत आहे.


कर्जत तालुक्यातील कानगुडेवाडी येथील ओम कानगुडे (वय 17) याच्यावर गेले काही दिवसांपासून पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले व ओमची झुंज अखेर संपली.
ओम हा कानगुडे कुटुंबियातील लाडका असल्याने कानगुडे कुटुंबियांसह कर्जत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी दहा वाजता कानगुडे वाडी येथे त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शामभाऊ कानगुडे व करमाळ्याचे जुने नाते असल्याने करमाळा व कानगुडे यांच्या दुःखात सहभागी झाला आहे. शहर व तालुक्यात सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.