करमाळासोलापूर जिल्हा

संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार संजयमामा शिंदेंना निवेदन

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले

शेती पंपाची वीज कनेक्शन तोडु नये व कोरोनाच्या काळातील सर्पुन विजबिल माफ करावे या मागणीचे निवेदन करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

पुढे निवेदनात म्हटले आहे, २०२० व २०२१ या काळात कोविड १९ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यावर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्न नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या कठीण काळात महावितरणकडून सक्तीची विज तोडण चालू आहे. ती थांबवण्यात यावी व विजबील वसुली त्वरीत स्थगित करण्यात यावी. तसेच कोरोना काळातील विजबील माफ करण्यात यावे. सरकारने शेतकर्यांच्या मालाला हमीभाव द्यावा हि आमची मागणी आहे.

यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा हि आमदार संजयमामा शिंदे यांना संभाजी ब्रिगेड करमाळाच्या वतिने निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे भाऊसाहेब साबळे, राकेश पाटील, पांडुरंग घाडगे, हेमा शिंदे, पिंटू जाधव, अत्तुल निर्मळ, शुभम कोठावळे, सुहास शिंदे, रनजीत कांबळे, लतेश घनवट, आकाश लोंढे, लालासाहेब लोंढे, समाधान लोंढे, प्रशांत लोंढे, ग्रा प सदस्य श्रीहरी आरने, कैलास साबळे, शिवहारी गोंडगिरे, तात्यासाहेब सपकाळ, बाबु शिंदे, दिनेश घाडगे, रेवननाथ निर्मळ, विष्णू शिरस्कर, वैभव मोहिते, दादा मोहिते, संतोष निर्मळ, शुभम कर्चे या वेळी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE