करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्याची राजकीय समीकरण बदलणार ?

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच बागल गटाचे नेत्या रश्मी बागल या जिल्हा परिषद या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आवर्जून जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे यांची भेट घेतली. यावेळी कांबळे यांनी बागल यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे दोन मोठे विरोधक एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याठिकाणी झालेली भेट ही सामाजिक कामाबद्दल असल्याचे बोलले जात आहे. पण आवर्जून दिलेली भेटीने संशयाची पाल चुकचुकली आहे हे नक्की.

करमाळा पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच नगर परिषद निवडणुकांच्या तोंडावर नेमका कोणता गट कोणाशी युती करणार यावर वारंवार चर्चा घडत असतात. पण प्रमुख नेते नेमका कोणता निर्णय घेतील याचा नेम नाही. वेगवेगळ्या युत्या आघाड्या करमाळा तालुक्यात बघायला मिळाले आहेत. त्यामध्ये काँग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये ही एकेकाळी युती झालेली करमाळा वासियांनी बघितलेले आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणात कोण कोणता गट कोणत्या बाजूला जाईल याचा नेम लागत नाही.

माजी आमदार नारायण आबा पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल हे मागील विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर अडून बसलेले होते. त्यात रश्मी बागल यांना यश आले. परंतु शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांना मात्र अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. तेव्हापासून शिवसेनेत दोन गट पडल्याचे दिसून आले होते. त्यामध्ये पाटील गटाकडे काही शिवसैनिक तर शिवसेना म्हणून रश्मी बागल यांच्याकडे काही शिवसैनिक पदाधिकारी गेल्याने शिवसेनेची ताकद तालुक्यात कमकुवत झाली होती. त्याचा फायदा अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना झाला ते आज आमदार आहेत.

त्यामुळे सर्व निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पाटील व बागल एकत्र येणार अशा चर्चा बऱ्याच दिवसापासुन सुरु होत्या. पण दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्याकडुन याला कधीच दुजोरा दिला गेला नाही. पण कोणत्याना कोणत्या कारणाने इतर कार्यकर्ते पण सोबत येतात पहिल्या प्रमाणे आता राग राहिलेला दिसत नाही त्या पार्श्वभूमीवर आज रश्मी बागल व पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना विचारले असता त्यांनी भेटी संदर्भात अधिक बोलणे टाळले तर दुसऱ्या कामासाठी परिसरात आल्या म्हणून त्यांचा सन्मान केल्याचे सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE