E-Paperसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका वक्तव्यावरुन वादाला सुरुवात ; भाषणाचा विपर्यास केल्याचे भरणेंचे स्पष्टीकरण

करमाळा समाचार 

सोलापूर महानगरपालिकेने झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गेले होते. त्यावेळी भाषण करत असताना महापौर यांनी मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू म्हणाल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावरान भाषण मी डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून देतो, मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या मरू द्या तिकडं असं बोलून गेले.

त्यामुळे त्या वक्तव्याचा विरोधक तसेच काही माध्यमातून समाचार घेण्यात आला आहे. त्यावर भरणे यांनी पुन्हा एक स्पष्टीकरण देत अजित पवार यांच्याप्रमाणेच बाळासाहेब पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपले ठाकरे यांच्यावर प्रेम असून काही माध्यमांनी त्याला चुकीचे वळण दिल्याचे या वेळी भरणे यांनी स्पष्ट केले व दिलगिरी व्यक्त केले आहे.

वास्तविक पाहता भरणे यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने घेतला गेल्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. परंतु भरणे यांच्या विरोधकांना भरणेंला विरोध करण्यासाठी आयते कारण मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अडगळीत पडलेले शिवसैनिक हे एकनिष्ठ असल्याचे दाखवून देण्यासाठी इतर शिवसैनिकासारखे पुढे येताना दिसत आहे.

याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, 43 एकरामध्ये हा गार्डन एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प शहरवासियांना उभा राहत आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुट्टीमध्ये आनंद घ्यावा असा प्रकल्प आहे. आपण डीपीडीसी मधुन उत्तम असा निधी देता येईल. यासाठी आपण प्रयत्न करूयात. यावेळी उशीरा आलेल्या महापौर म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांकडुन निधी आणु त्यावर बोलताना मी म्हणालो गार्डन साठी आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून पैसे द्यायचे तर तुम्ही महानगरपालिकेचा तसा प्रस्ताव आम्हाला ताबडतोब सादर करा. मुख्यमंत्र्यांचा नंतर बघू. माझ्या भाषणामध्ये असणाऱ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. त्याबद्दल यात कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
दत्तात्रय भरणे , पालकमंत्री सोलापूर

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE