करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील तीन महसुल अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव

करमाळा – दिलीप दंगाणे

करमाळा तालुक्याची नायब तहसीलदार एस व्ही बदे यांनी पुणे विभागातील उप आयुक्त (पुरवठा )कार्यालय व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय व अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय सर्व तहसील कार्यालय (पुरवठा शाखा) सर्व गोदामे व सर्व परिमंडळ कार्यालय यांचे आय एस ओ 9001 – 20 15 व आय एस ओ २८०००-२००७ मानांकन करण्याचा तसेच सर्व रास्त भाव दुकानांचे आय एस ओ ९००१-१०१५ मानांक करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला होता.

या कार्यक्रमात करमाळ्याचे नायब तहसीलदार एस व्ही बदे यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रामध्ये या मानांकन कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली व सदरचे काम अत्यंत कौतुकास्पद केल्या बद्दल १ मे २०२२ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच करमाळा तालुक्यातील अर्जुनगर चे मंडळ अधिकारी एस एस काझी यांना देखील जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून संवर्गात राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या (NLRmp) अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत करमाळ्याचे अमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात आला.

ads

तर वांगी गावचे गाव कामगार तलाठी श्री समाधान भुजबळ यांना देखील संवर्गात राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा देखील गौरव करून मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE