करमाळासोलापूर जिल्हा

आदिनाथचा करार फायद्याचा का तोट्याचा ; करारातील अटी आपण बघितल्या का ?

करमाळा समाचार 

सध्या तालुक्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा विषय चर्चिला जात आहे. पण कारखान्याच्या करार होऊन सुद्धा बरेच दिवस उलटले पण अद्याप नेमका करार काय आहे. याबाबत स्पष्ट बोलण्यासाठी कोण पुढे येत नाही. नेमका करार आहे तरी कसा ? हे अजून कोणालाच माहीत नसल्याने हस्तांतरण करणे योग्य की अयोग्य हे कोणच ठरू शकत नाही. फक्त कारखाना सुरू व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण भाडेतत्त्वावर गेल्यास फायद्याचा का सहकारी तत्त्वावर राहिल्यास फायद्याचे याचा कोणच विचार करताना दिसून येत नाही.

वास्तविक पाहता आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा करार हा कारखान्याने केलेला नसून तो बँकेने केलेला आहे. कारखाने फक्त याला संमती दिलेली होती. त्यामुळे या करारासंदर्भात कारखाना संचालक मंडळ व संबंधित गटाचे नेते यांचा काही संबंध येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मुळात बँकेने हा निलाव केल्यामुळे कराराच्या अटी व शर्ती ठेवण्याचा अधिकार व भाडे घेण्याचा अधिकारही बँकेलाच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे बारामती ॲग्रो या संस्थेला जर आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिला तर बारामती ॲग्रो ठरल्याप्रमाणे कारखान्याचे भाडे हे थेट बँकेत जमा करणार आहेत. जोपर्यंत कर्ज भेटत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. तर कारखान्यात उत्पादित होणारे साखरेच्या प्रत्येक क्विंटल प्रमाणे काही रक्कम व भाडे अशी रक्कम संपूर्ण बँकेच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्या माध्यमातून बँकेचे कर्ज फेडल्यानंतर पुढील रक्कम ही कारखान्याच्या खात्यावर जाईल अशी माहिती मिळाली आहे.

बारामती ॲग्रोकडे कारखान्या गेल्यास तो कारखाना शेतकऱ्यांची मागील देणे, कामगारांचे पगार व वाहतूकदाराची देणगी देण्यास बांधील नसणार आहे. हा करार एक व्यावसायिका प्रमाणे बारामती ॲग्रो सोबत बँकेने केलेला आहे. त्यामुळे यात पवार कुटुंबीय असोत किंवा बारामती ॲगो हे कराराप्रमाणे केवळ व्यवहार करणार असल्याचे दिसून येते. मागील देणे देण्यासंदर्भात यात कुठेही वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या भाडेतत्तवाच्या पैशाचं काय करायचा तो पूर्ण अधिकार हा बँकेला असणार आहे. त्यामुळे केवळ प्रत्येक महिन्याचे पगार ही कामगारांना मिळत राहील. पण मागील पगारांसाठी कारखाना पूर्णपणे कर्जमुक्त झाल्यावरच मागील पगारी मिळू शकतील अशी शक्यता आहे.

त्याशिवाय जर हा कारखाना बारामती ॲग्रो ला न देता सहकारी तत्त्वावर चालण्याचे ठरवले. तर जे चालवणार आहेत त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामध्ये मागील देणे, कामगारांच्या पगारी व पुढील नियोजन कशा पद्धतीने केले जाणार आहे, कारखाना कोणाच्या ताब्यात दिला जाणार आहे हे अजून गुलदस्त्यात असल्याने नेमका कारखाना हस्तांतरित करून भाडेतत्त्वावर देणे चांगले का सहकारी तत्त्वावर देणे चांगले हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण या सर्व भानगडीत कारखाना यंदाही वेळेवर सुरू होईल याची काळजी सर्वांनी घेतलेली बरी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE