पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार ; प्रहारच्या आरोपानंतर अधिकाऱ्यांकडुन ठेकेदारावर ताशेरे
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील मौजे भाळवणी गावामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत असणारी पाणीपुरवठा योजना चार वर्ष होऊन देखील या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. गावातील लोक आजूबाजूच्या गावातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी आणतात भयंकर परिस्थिती या गावांमध्ये उद्भभवले आहे.

अनेक गावकऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत असे व इतर पंचायत समिती जिल्हा परिषद अंतर्गत तक्रारी केल्या असता देखील कोणीही अधिकारी दखल घेतल घेत नव्हती. याचे काम शिवनेरी कंट्रक्शन कंपनीने घेतले होते. त्यांनी कामे निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. काम पूर्ण न करता अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी तक्रार त्यांनी सचिव प्रधान सचिव व पाणीपुरवठा मंत्री यांना केली. त्यामुळे प्रहार संघटना यांनी या मध्ये लक्ष घालून व आक्रमक होऊन संबंधित अधिकाऱ्याची चर्चा केली.

यावेळी हा कॉन्टॅक्टर भ्रष्टाचारी आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी व गावाला पाणी कसं मिळेल याबद्दल प्रहारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या. त्यामुळे संबंधित पाणीपुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता दीपक कोळी, उप अभियंता अजित वाघमारे, शाखा अभियंता वाहेकर साहेब यांनी मीटिंग घेऊन या गावांमध्ये आल्यावर संबंधित काम निकृष्ट दर्जा हे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला चार ते पाच महिन्यांमध्ये या गावाला पाणी मिळेल असे आश्वासन दिले असे प्रहार तालुकाध्यक्ष संदिप तळेकर यांनी सांगितले.
यावेळी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार , तालुका संघटक नामदेव पालवे, भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, भाळवणीचे ग्रामसेवक केकान साहेब, संतोष कोपनर, धनंजय शिंदे, जालिंदर पाडुळे, विशाल धेंडे, शंकर धेंडे, अतुल धेंडे, संजय पवार, इलाही मुलाणी, महादेव टकले, तानाजी फरतडे, योगेश टकले, दादासाहेब वाघमारे, राहुल फरतडे, तानाजी काळे, विलास धेंडे, वैभव धडस, कृष्णा शिंदे यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन केले.