करमाळासोलापूर जिल्हा

तर मला तुमचा कार्यक्रम लावावा लागेल ; खा. रणजीतसिंह नाईकनिंबाळकरांचा अधिकाऱ्यांना इशारा

करमाळा- समाचार टीम


कोणाचाही अळमटळम पणा खपऊन घेतला जाणार नाही. नागरीकांच्या तक्रारी अर्जावर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा अधिकाऱ्यांचा कार्यक्रम लावला जाईल असा सज्जद खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा येथे आयोजीत आढावा बैठकीत उपस्थीत अधिकाऱ्यांना दिला आहे. ते गुरुवारी करमाळ्यात आले होते. यावेळी नागरीकांच्या प्रश्नावरुन अधिकाऱ्यांची कानऊघडणी खा. निंबाळकर यांनी केली.

आयोजीत आढावा बैठकीत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये रस्ता, पाणी, ग्रामसेवक, तलाठी शिक्षक, आरोग्य आदि विषयांवर नागरिकांनी तक्रारी केल्या यावेळी खा. निंबाळकर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यावेळी अनिल तेली या ग्रामस्थाने पांडे येथील शिक्षकांबद्दल तक्रार करताच त्याची गांभीर्याने दखल घेऊन खा. निंबाळकर यांनी तत्काळ निलंबीत करण्याची सूचना केली तर कारवाई न केल्यास तुमच्यावर कारवाई करु असा इशाराही गटशिक्षणाधिकारी यांना दिला आहे. तर पांडे येथे ग्रामसेवक व तलाठी नसतात याचीही
दखल तहसिलदार समीर माने यांनी तात्काळ घेतली.

तसेच फिसरे येथील उप सरपंच संदिप नेटके यांनी गावाला निधी मिळाला नसल्याची तक्रार करताच खासदार यांनी निधी देण्याचे जाहीर केले तसेच नेटके यांनी मोठ्या रस्त्याच्या कामासाठी लागणारा कच्चा माल हा गावातील रस्त्याने जात असल्याने रस्ते खराब झाले याची जबाबदारी कोणी घ्यायची असा प्रश्नही उपस्थित केला त्यावर पोलिसांनी लक्ष घालावे व प्रमाणापेक्षा वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

यावेळी तहसिलदार समीर माने , गटविकास अधिकारी मनोज राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विठ्ठल भणगे, डॉ. अमोल घाडगे, किरन बोकन, हरीदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, दत्तात्रय जाधव, शंभुराजे जगताप उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE