खेळांमुळे सर्वांगीण विकासः बॉक्सिंग उपाध्यक्ष व्हावळ यांचे मत
करमाळा/ प्रतिनिधी
आपल्या जीवनात खेळांचे मोठे महत्व आहे. विद्यार्थीदशेत असताना मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. खेळांमुळे सर्वांगीण विकास होतो. असे मत बॉक्सिंगचे प्रशिक्षक महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी मांडले.

येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्हावळ बोलत होते. यावेळी पनवेल येथील बॉक्सिंग प्रशिक्षक अद्वैत शेंनवणेकर, ॲड. संग्राम माने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना बॉक्सिंग प्रशिक्षक शेंनवणेकर यांनी बॉक्सिंग खेळाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये चांगली ऊर्जा व उत्साह असतो. त्याचा योग्य वापर झाल्यास भविष्यातील गुणवान खेळाडू बनतील. असा विश्वास व्यक्त केला.
ॲड. माने यांनी आश्रमशाळेची माहिती दिली. तसेच मान्यवरांचे सन्मान केले. उपस्थितांचे आभार आश्रमशाळेचे अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी मानले.
–
फोटो
करमाळाः महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पनवेल येथील बॉक्सिंग प्रशिक्षक अद्वैत शेंनवणेकर यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ॲड. संग्राम माने उपस्थित होते.