करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात काल झालेल्या आकडेवारी शहरात सर्वाधिक पावसाची नोंद

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. हाती लागलेल्या आकडेवारी नुसार करमाळा तालुक्यात १४७ mm पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद करमाळा शहरात झाली आहे. सदरची आकडेवारी केवळ मंडळनिहाय असल्याने नेमका पाऊस किती पडला ही माहीती जरी मिळत नसली तरी सदर ठिकाणची आकडेवारी पुढील प्रमाणे..

करमाळा तालुक्यातील पावसाची सरासरी नोंद
३ ऑगस्टचा पाऊस .. मंडळनिहाय
करमाळा 72 mm
कोर्टी 06 mm
केम 12 mm
केत्तुर 05 mm
जेऊर 16 mm
सालसे 08 mm
उमरड 19mm
अर्जुननगर 09mm
एकुण पाऊस 147mm

सदर पावसाचा फायदा शेतकऱ्यांना दिसुन येणार आहे . बऱ्याच दिवसापासुन पाऊस नसल्याने वातावरणातील गरमीही वाढलेली होती. पण आता पडलेला पाऊस मोजक्या भागात मोठ्याप्रमाणावर पडलेला दिसुन येतो अद्यापही केत्तुर व कोर्टी पसिसरात पावसाची प्रतिक्षाच आहे. सदर पाऊस करमाळा, कात्रज, जिंती, पांडे परिसरात मोठ्याप्रमाणावर पडलेला दिसुन आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE