करमाळासोलापूर जिल्हा

कुकडीच्या पाण्यासाठी अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर रस्तारोको ; संतोष वारेंचे नेतृत्व सर्वपक्षीय आंदोलन

प्रतिनिधी – करमाळा

कुकडीचे पाणी मांगी तलावात व परिसरातील गावांना मिळवण्यासाठी बुधवारी 27 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता टेंभुर्णी नगर हायवेवर जातेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सदरचे आंदोलन हे राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या नेतृत्वाखाली होत असून या आंदोलनात सर्वपक्षीय गटातटाचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती वारे यांनी दिली आहे.

मांगीतला परिसरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला नसल्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. मांगीवरती बारा गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेले आहे. परंतु मांगी तलावामध्ये उपलब्ध पाणीसाठा नसल्यामुळे ही योजना सद्यस्थितीत बंद आहे. तरी याचा पाठपुरावा कुकडी कोळवाडी कार्यालयात तसेच करमाळा तहसील कार्यालय यांना वेळोवेळी निवेदन देऊन व रस्ता रोको आंदोलन करूनही कुकडीच्या अधिकारी मांगीतलावात व परिसरात कुकडीचे पाणी कॅनल चारीला पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत आहेत.

politics

आता कुकडी धरणाचा पाणीसाठा पाहता कुकडी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा शिल्लक आहे. तसेच आता त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे असल्यामुळे सध्या ओव्हर फ्लो चे पाणी श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात सुरू आहे. ते पाणी मांगी तलाव, रावगाव, भोसे, पुनवर, जातेगाव, वडगाव, कामुणे, खडकी, पोथरे अशा कुकडीच्या कॅनल चारीला सोडण्यात यावे. यासाठी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा सचिन नलावडे, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे ता. अध्यक्ष सुदर्शन शेळके, रामभाऊ नलावडे, विठ्ठल शिंदे, संदीप नलावडे,लक्ष्मण भालेराव, चंद्रकांत काळे, शिवदास नलावडे, औदुंबर नलावडे, अजित पवार, रमेश पाटील, माधव पाटील, महेश मोरे, आप्पा जाधव, समीर शेख, अशोक वारे, बापु बर्डे, राहुल पवार, छगन लगस, पंकज नलावडे, दादासाहेब कुदळे, संजय शिंदे, सागर जगताप, अशोक शिंदे, अशोक वारे आदिंच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE