करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पाण्याची अडचण दुर करण्यासाठी सावंत यांच्याकडुन प्रयत्न ; माहुलेच्या पाठपुराव्याला यश

करमाळा समाचार

करमाळा शहरातील खडकपुरा भागात बऱ्याच दिवसांपासून पाण्याचा हातपंप बंद पडलेला होता. त्याला अनेदा दुरुस्त केले पण ते सतत बंद पडत होते. पण आता दुरुस्ती करण्याऐवजी त्या ठिकाणी मोटर बसून त्यामधून पाणी उपसा करून पाणी टाकी बसवण्यात आली. याकामात सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या पुढाकारातून सदरचे काम करण्यात आल्याने खडकपुरा, डवरी गल्ली, साठे नगर परिसरात वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावेळी परिसरातील लोकांनी सावंत यांचा सन्मान केला. सदरचे काम युवा नेते सचिन माहुले यांच्या पाठपुराव्यातुन झाले आहे.

यावेळी या ठिकाणी दोन हजार लिटरची टाकीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी संपूर्ण टाकी भरून पाणी भरल्यानंतर पाण्याची पूजन सुनील सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातील खडकपुरा भागात पाणी भरण्याची अडचण निर्माण झाली होती. याबाबी लक्षात घेत लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

अलिखान पठाण, इन्नुस मणेरी, अख्तर पठाण, मनोज पाटणे, मुक्तार पठाण, कासम बागवान, विनोद पडवळे, अर्शान पठाण, जमीर पठाण, जावेद पठाण, फिरोज शेख, शिवाजी माहुले, चंदु कारंडे, बजरंग गायकवाड, नितीन गुरव, बद्रीनाथ गायकवाड, उपस्थित होते.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE