करमाळासोलापूर जिल्हा

जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

शेटफळ(प्रतिनिधी)

कोरोना काळात आई वडील गमावलेल्या बालकांचे शिक्षण थांबू नये, ती बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत या हेतूने जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम व शेटफळ येथील अशा अनाथ गरजू बालकांचं शैक्षणिक पालकत्व मागील वर्षी घेण्यात आले आहे.

त्या सर्व बालकांना या वर्षीच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवारी करण्यात आले. सोगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात हे शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले तर शेटफळ येथे त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हे साहित्य देण्यात आले.

यावेळी जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यासह आलेले फाउंडेशनचे सभासद व उद्योजक निलेश पाखरे, साहित्यिक गंगासेन वाघमारे यांचा ही सन्मान करण्यात आला.

सोगाव येथे साहित्य वितरित करताना सरपंच स्वप्नील गोडगे, ग्रामपंचायत सदस्य बापु सलपुरे, विलास सव्वालाख, दया सरडे, दत्ता सावंत, दादा गोडगे, राजेंद्र नगरे, दादा सरडे व नागरिक उपस्थित होते. तर शेटफळ येथे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र पोळ यांच्यासह गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नाईकनवरे व नागनाथ माने उपस्थित होते.

जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने गावातील खऱ्या गरजू, कोरोनाने छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत आहे ही समाधानाची बाब आहे. मागील वर्षी ही ते या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य घेऊन आले होते. गावाच्या वतीने त्यांचे आभार मानतो.
सरपंच गोडगे, सोगाव ग्रामपंचायत

जगदीश भाऊ आमच्या लेकरांसाठी शाळेचं साहित्य घेऊन आठवणीने आले , आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर त्यांचं लक्ष आहे, या गोष्टीचा आधार वाटतो.
बालकांची आजी, शेटफळ

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE