करमाळासोलापूर जिल्हा

कुकडी पाणी प्रश्नी झालेल्या रास्तारोको आंदोलन चिघळल्याने बागल यांच्यासह 42 जणांवर कारवाई

समाचार टीम

जर मांगी तलावात पाणी सोडले नाही, तर संपुर्ण तालुका पेटल्याशिवाय राहणार नाही’ अशी रोखठोक भूमिका घेत मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वात आज मांगी तलावाच्या प्रश्नासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पण आंदोलन चिघळल्याने दिग्विजय बागल, सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह 42 जणांवर कारवाई झाली आहे.

आजच्या आंदोलनात मांगी तलावावर अवलंबून असणाऱ्या बोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजने मधील गावे तसेच मौजे मांगी, जातेगाव, वडगाव, हिवरवाडी व रावगाव या गावातील व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

या आंदोलनात श्री. बागल व ग्रामस्थ यांनी ही ‘कुकडी धरणाचे अतिरिक्त(ओव्हरफ्लो)चे पाणी तातडीने सोडण्याबाबतची मागणी जोर लावून धरली. करमाळा पोलीस निरीक्षक श्री. कोकणे यांनी बागल व ग्रामस्थांना झालेल्या वाहतुकीचा अडथळा व किलोमीटरभर लांब लागलेल्या वाहनांच्या रांगा याबाबत सांगितले, पण बागल यांच्या सोबत ग्रामस्थांनी रस्त्यातून हटणारच नाही अशी ठोक भूमिका घेतल्याने तेथे तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनकर्त्यांच्या ‘पाणी आमच्या हक्काचं’ घोषणांनी संपूर्ण महामार्ग दणाणून गेला होता.

यावेळी दिग्विजय बागल हे सर्वांशी बोलताना म्हणाले की मांगी ता. करमाळा येथील तलावामध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. पावसाळा सुरु होवुनही दोन महिने झाले असुन अद्याप मांगी व तलावाच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु सध्या पुणे जिल्हयात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कुकडीच्या धरण साखळी म्हणजे येडगाव, डिभे, पिंपळगाव (जोगा), माणिकडोह, वडज इत्यादी धरणामध्ये अंदाजे ८০% टक्क्यांच्या पुढे जलसाठा झालेला आहे. परंतु मांगी तलावामध्ये पाणीसाठा समाधानकारक नसल्याने मांगी तलावावर अवलंबुन असलेल्या मांगी सह इतर गावच्या पाणी पुरवठा योजना व शेतकऱ्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे.

मांगी तलावावर बोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही आठ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना अवलंबुन आहे. तसेच मौजे मांगी, जातेगाव, वडगाव, हिवरवाडी व रावगाव या गावांनाही पिण्याचा पाणी पुरवठा अवलंबुन आहे. प्रशासनास यापुर्वी कुकडी कॅनॉलव्दारे पावसाळयातील अतिरीक्त पाणी तातडीने मांगी तलावामध्ये सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी वेळो- वेळी मागणी आहे परंतु त्यावर अद्याप त्यावर कोणताही ठोस निर्णय झालेला दिसत नाही. असे दिग्विजय बागल यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिग्विजय बागल यांच्यासह 42 ग्रामस्थांना यावेळी पोलीस प्रशासनाने अटक केली. आंदोलनाच्या सरतेशेवटी संबंधित विभागाचे अधिकारी श्री. काळे यांनी कुकडी धरणातील ओव्हरफ्लो चे पाणी मांगी तलावात सोडू असे आश्वासन दिले. पण फक्त आश्वासन देऊन चालणार नाही जो पर्यंत पाणी येणार नाही तो पर्यंत हे आंदोलन चालूच राहील. या विषया संदर्भात लवकरच शेतकऱ्यांना घेऊन जलसंपदा विभागाच्या मंत्रीमहोदयांची भेट घेणार आहे असेल बागल यांनी सांगितले आहे.

यांच्यावर कारवाई झाली …
1) दिग्वीजय दिगंबर बागल वय-27 वर्षे रा. मांगी 2) आदेश दत्तात्रय बागल वय-27 वर्षे रा. मांगी 3) निखिल प्रकाश बागल वय-55 वर्षे रा. मांगी 4) धीरज दत्तात्रय बागल रा. मांगी 5) सुभाष कोंडीबा बागल वय 54 वर्षे रा. मांगी 6) महादेव शिवाजी अवचर वय 60 रा. मांगी 7) शिवाजी दादा जाधव वय 25 वर्षे रा. वडगाव) 8) किशोर बाळासाहेब बागल व्य-30 वर्षे रा. मांगी 9) आबासाहेब अडसुळ वय-32 वर्षे रा. हिवरवाडी 10) नवनाथ किसन सुरवसे वय-56 वर्षे रा. मांगी 11) तात्या बागल रामांगी 12 ) प्रितम अवचर रा. मांगी 13) चंद्रकांत मच्छिद्र बगल वय-55 वर्षे रा. मांगी 14) हरिश्चंद्र आनंदा झिंझाडे वय 41 वर्षे रा. पोथरे 15) अशोक रेवनानाथ शिंदे वय 35 वर्षे रा. पोथरे 16) पुरुषोत्तम किसन नरसाळे वय-45 वर्षे रा.मांगी 17) बाप्पासाहेब पोपट शिंदे वय-39 वर्षे रा. पोथरे 18) पद्माकर बाळलाल संचेती वय 60 वर्षे रा. मांगी 19) राजेंद्र भागवतराव बागल वय-51 वर्षे रा. मांगी 20) दत्तात्रय मच्छिंद्र बागल वय-55 वर्षे रा.मागी 21] नवनाथ किसन सुरवसे वय-50 वर्षे रा. मांगी 22 ) प्रदिप जालिंदर भोसले वय-34 वर्षे रा. मांगी 23) समाधान तुकाराम कडवकर वय 27 वर्षे रा.मांगी 24) अमित अंबादास बगल वय 40 वर्षे रा. मांगी 25) सौरभ दिलीप बागल वय-28 वर्षे रा. मांगी 26) उध्दव मच्छिंद्र बागल वय-50 वर्षे रामांगी 27) बापु उत्तम ननवर वय-48 वर्षे रा. मांगी 28) सतिश परशुराम रोडगे वय 40 वर्षे रा. वडगाव (द) (29) शिवाजी गणपत जाधव वय-25 वर्षे रा. वडगाव (उ) 30) शिवाजी ज्ञानदेव बंडगर वय-58 वर्षे रा. ढोकरी 31]प्रविण दराडु भांडवलकर वय 25 वर्षे रा. मांगी 32) किरण शरद क्षिरसागर वय 23 वर्षे रा. मांगी 33) अनिल वामन इटकर वय-32 वर्षे र हिवरवाडी 34) उदय सुभाष बागल वव- 36 वर्षे रा. मांगी 35) प्रितम लहु अवचर दय-25 वर्षे रामांगी 36) तात्यासाहेब हरीभाउ दाहाल वय 45 वर्षे मांगी 37) नवनाथ बलमीम दागलय 47 वर्षे रा. मांगी 38) तुषार बाळासाहेब बागल वय 40 वर्ष रा. मांगी 39) सुभाष जीजाबा बागल वय-48 वर्षे रा. मांगी 40) दिनेशदास मांडवकर वय-55 वर्षे वडगाव (द) 41) शिवशंकर दशरथ जगदाळे वय 42 वर्षे रा. वडगाव (द) 42)चिंतामणी नामदेवराव जगताप वय-48 वर्षे रा. करमाळा

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE