करमाळासोलापूर जिल्हा

ती फाऊंडेशन सॅनिटरी पॅड बँक मार्फत मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप व आरोग्य विषयक मार्गदर्शन

करमाळा –

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मा. ‘ आमदार भारतीताई लव्हेकर अध्यक्षा ‘ ती फाऊंडेशन सॅनिटरी पॅड बँक ‘ वर्सोवा अंधेरी (पश्चिम) यांच्या मार्फत महाविद्यालयातील गरजू 108 विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले आणि ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँकेची फिल्म दाखवण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य मिलिंद फंड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘ती फाऊंडेशन सॅनिटरी पॅड बँक ‘ चे सक्रिय कार्यकर्ते सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. सुदेश रासकर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , संस्थेचे खजिनदार माजी मुख्याध्यापक श्री. गुलाबराव बागल हे उपस्थित होते .

politics

याप्रसंगी प्रा. सौ. मुक्ता काटवटे यांनी आपल्या प्रास्ताविकात डॉ.भारती लव्हेकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच महिलांच्या आरोग्याविषयी प्रश्न मांडले व मासिक पाळी वेळी चार दिवस सुट्टी आणि स्वच्छतेच्या अधिकाराची गरज व्यक्त केली . तसेच प्रा. सुरेखा जाधव यांनी मासिक पाळी हे महिलांना मिळालेले वरदान आहे . त्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही असे मत मांडले व सॅनिटरी पॅड दरमहा रेशन कार्ड वर मिळण्याबाबत मागणी केली . यावेळी प्राचार्य एल. बी. पाटील यांनी डॉ.भारती लव्हेकर यांना त्यांच्या कार्याबद्दल धन्यवाद दिले व असे उपक्रम राबवण्याचे गरज व्यक्त केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुदेश रासकर यांनी डॉ. भारती लव्हेकर यांच्या महिलांच्या व मुली बाबतच्या विविध कार्याचा आढावा घेतला.

तसेच दरमाहा सॅनिटरी पॅड देण्याचे व पॅड डिस्पोज मशीन देण्याचे आश्वासन दिले आणि खेड्यापाड्यातील शाळांनी व महिलांनीही सॅनिटरी पॅड ची मागणी केल्यास ‘ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक ‘ मार्फत त्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी महिलांच्या अंधश्रद्धा व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. तसेच यावेळी कुमारी सुप्रिया पवार , कुमारी स्नेहल कांबळे व कुमारी साक्षी नरसाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ . सुजाता भोरे यांनी केले. तर आभार प्रा. सौ. नीता माने यांनी मानले. या कार्यक्रमासाठी बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्यां सौ. स्वप्नाली लोणकर , महाविद्यालयातील महिला शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य संभाजी किर्दाक , राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख , प्रा.मुन्नेश जाधव , प्रा. बिभिषण मस्कर ,प्रा. दिलीप थोरवे , श्री. विजयसिंह साळुंखे , श्री. गणेश जाधव , श्री. महादेव वाघमारे यांनी परिश्रम घेतले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE
Audio Player
WhatsApp Group