E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

प्रहारचा व्यापाऱ्यावर प्रहार – राजुरीतील शेतकऱ्याने मानले प्रहारचे आभार

करमाळा समाचार 


राजुरी गावचे शेतकरी बिबीशन माणिक साखरे यांनी गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या शेतातील कांदा सोलापूर येथील कांद्याचे व्यापारी गुरुनाथ उपासे या व्यापाऱ्याच्या आडती वर सुमारे 71 हजाराचा कांदा घातला होता. परंतु व्यापाऱ्याने 11 हजार रुपये रोख देऊन बाकीचे 60 हजार रुपये देण्यासाठी टाटा केले आणि गेल्या दोन महिन्यापासून पैसे बुडवणे च्या मानसिकतेने फक्त या शेतकऱ्याला सोलापूरला तीन-चार वेळा हेलपाटे घालायला लावले आणि दिलेला चेक सुद्धा बॉन्स झाला.

नंतर शेतकऱ्याला दोन-तीन वेळा दमदाटी करून तुझे पैसे देत नाही तुला काय करायचे ते कर अशा प्रकारची भाषा वापरली असता. संबंधित शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांना संपर्क साधला. त्यानंतर संदीप तळेकर यांनी सोलापूर शहराचे कार्याध्यक्ष खालील भाई मणियार यांना फोनवरून संबंधित घटनेची माहिती दिली.

त्यानंतर प्रहार संघटना स्टाईलने शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनात खालिद भाई यांच्या नेतृत्वात प्रहार च्या टीमने व्यापार्‍यावर भेट दिली असता तात्काळ व्यापाऱ्याने 60 हजार रुपयांची तरतूद करून शेतकऱ्याच्या खात्यावर ती रक्कम जमा केली.

सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात जर शेतकऱ्यावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर त्यांनी तात्काळ स्वरूपात प्रहार संघटनेची संपर्क करावा, आसे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE