दारु सोडल्यास.. तालुक्यातील विविध संस्था व पंचायत समीतीच्या वतीने अनोखा उपक्रम ; पाल्याला होईल फायदा
समाचार टीम –
तालुक्यातील यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था ग्राम सुधार समिती जीवन शिक्षण परिवार व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने दारू सोडा व आपल्या पाल्याला शिष्यवृत्ती मिळवून द्या हा अभिनव उपक्रम व अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. यामुळे दारू सोडणाऱ्या पालकांच्या मुलांना याचा निश्चित लाभ होणार आहे.
दारूचे दुष्परिणाम लक्षात घेता दारूमुळे कुटुंबाचे तर नुकसान होतेच. पण शरीरावर साठ प्रकारचे दुष्परिणाम वैद्यकीय शास्त्राने सिद्ध केले आहेत. यातले दुष्परिणाम जठर, यकृत, पचन संस्था, रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू अशा अनेक अवयवांवर प्रभाव करतात. तर अपघातात ही 20% दारु प्रभावित होतात. या सर्व प्रकारांमध्ये दारू हा एकमेव घटक असतो. व्यक्तिगत व कौटुंबिक दृष्ट्या दारूमुळे अतोनात नुकसान होते.
घरातील एक माणूस गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान 20 जणांचे तरी जीवन नासते त्रासाला, निर्दयतेला बळी पडते. त्याच्या शरीराचे नुकसान होते. हे वेगळेच डोक्यात पासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही. माणूस दारू पिण्याच्या आजारात अडकला की काय होते, तो एका बाजूला मानसिक गुलामी आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक अडचणी या कात्रीत सापडतो. त्यामुळे अशी योजना या संस्थांच्या माध्यमातून काढण्याची दिसून येते.
दारू सोडणारे व्यक्तीने यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या आयुष्याच्या साधून 15 ऑगस्ट 2022 रोजी दारू सोडण्याबाबतची स्वयंपूर्ण शपथ ग्रामपंचायत समोर घ्यायची आहे. इथून पुढे मी कुठल्याही प्रकारचे मद्यप्रदेश करणार नाही आणि पुढील 15 ऑगस्ट 2023 पर्यंत संबंधित व्यक्तीने त्याचे तंतोतंत पालन केले तर तालुकास्तरीय अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचा यथोचित सत्कार करून त्याच्या पाल्याला पुढील वर्षी शिष्यवृत्ती घोषित केली जाईल. याबाबतचे पत्रही गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास, अधिकारी व सर्व ग्रामपंचायत यांना पाठवले आहे.