करमाळ्यात आज देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ; तहसिल परिसरात उपस्थित राहण्याचे आवाहन
समाचार टीम
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त मागील दोन दिवसांपासून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्या अनुषंगाने आज सायंकाळी पाचच्या वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय परिसरात करण्यात आला आहे.

महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने संदीप पाटील प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम “वंदे मातरम” या कार्यक्रमाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. संदीप पाटील हे करमाळा तालुक्यातील नावाजलेले गीतकार असून त्यांचा आर्केस्ट्रा सुप्रसिद्ध असा महाराष्ट्रात फेमस ऑर्केस्ट्रा आहे. या मधून गीतांच्या रसिकांना एक चांगल्या गीतांची मेजवानी मिळणार आहे.

तरी सदर कार्यक्रमाला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरचे आवाहन हे तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.