रेल्वे प्रवासी संघटनेचा 18 मार्चला मोर्चा- सहभागी होण्याचे आवाहन
करमाळा समाचार- संजय साखरे
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील आणि मध्य रेल्वेचे मुख्य स्टेशन आणि मोठी बाजारपेठ असणारे ठिकाण हे पारेवाडी रेल्वे स्टेशन असुन, उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रामुळे देखिल या स्टेशनला विशेष महत्व आहे. सदर रेल्वे स्टेशन हे पुनर्वसित स्टेशन असुन केत्तुर नं-२ गावठाणाच्या हद्दीत वसलेले हे स्टेशन आहे. या स्टेशनच्या निर्मिती पुर्वी मध्य रेल्वे च्या जुन्या ट्रकवर पोमलवाडी, कात्रज अशी स्थानके होती.

ऊस, केळी , गहु, भाजीपाला या प्रमुख पिकांचे व्यतिरिक्त या भागातील मासेमारी चा व्यवसाय देखिल खुप मोठ्या प्रमाणावर चालतो. या स्टेशन परिसरात तीस ते पस्तीस गावे असुन, राशीन, कोर्टी पासुन चे प्रवासी या ठिकाणाहुन मुंबई, पुणे, सोलापुर, हैदराबाद व अन्य ठिकाणी प्रवास करतात.
सन-१९९७ साली कै. माजी. आमदार. रावसाहेब भगवानराव पाटील, कै. माजी जि. प. सदस्य रामकृष्ण रावजी पाटील, ज्येष्ठ नेते श्री. रामराव साहेबराव पाटील यांचे मार्गदर्शनाने करमाळा शिवसेनेचे तत्कालीन दिवंगत नेते कै. शिवाजीराव मांगले, माजी जिल्हा परिषद सदस्य. शहाजीराजे भोसले आणि परिसरातील सर्व तरुण युवक मंडळींच्या आणि ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थित तसेच नेताजी सुभाष विद्यालयातील १९९७ साली बॅचचे सर्व विद्यार्थी- शिक्षक यांनी हजारोंच्या संख्येने तब्बल पाच तास कर्नाटका एक्सप्रेस अडवुन रेलरोको आंदोलन केले होते.
त्यावेळी अनेक ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती त्यामधे प्रामुख्याने वरील ज्येष्ठ व्यक्तिंसह उदयसिंह पाटील, सुर्यकांत पाटील, अॅड. अजित विघ्ने, कैलास निसळ, श्रीहरी देवकते, रामहरी जरांडे, देविदास खाटमोडे, सुनील नगरे, कल्याण खाटमोडे, गणपत खाटमोडे पाटील, निवास निसळ, ओमप्रकाश जोशी, नवनाथ राऊत, तुकाराम तात्या खाटमोडे, रोहीदास शिंदे सर, देवराव नवले, भजनदास खाटमोडे, डॉ. दोभाडा, भाजपा नेते प्रशांतशेठ दोभाडा .यांचेवर केसेस दाखल झाल्या.
करमाळा आणि दौंडच्या कोर्टात तब्बल पाच- सहा वर्षे सर्वांनी फेऱ्या मारल्या.. कारण होते रेले रोका.. मात्र रेल्वे प्रशासनाने गाडी काही थांबवली नाही. तरीही आजपर्यंत निरंतरपणे हा संघर्ष चालुच आहे. अनेक रेल्वे मंत्री बदलले.. सरकार बदलले परंतु अजुनही आपली मागणी पुर्ण होत नाही याची खंत आहे. निवडणुका झाल्या की प्रत्येक वेळेस निवेदन देऊन देऊन अक्षरशः थकलो आहोत.. तरीही नव्या उमेदीने आणि उत्साहाने आशावादी आहोतच.
आजपर्यंत अनेक बड्या नेत्यांना भेटलो आहे.. त्यामधे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मा.सुशिलकुमार शिंदे साहेब, मा. रामदासजी आठवले साहेब, मा.पृथ्वीराजबाबा चव्हाण, मा. ममता बॅनर्जी, मा.सुरेश प्रभु, सुरेश कलमाडी, मा. नारणदास राठवा, मा.लालुप्रसाद यादव, मा. बबनदादा शिंदे,मा.प्रणितीताई शिंदे, मा. विजयसिंह मोहिते पाटील, मा.रणजितसिंह मोहिते- पाटील, मा.सुभाषबापु देशमुख, मा.सुप्रियाताई सुळे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे आणि अनेक मान्यवर मंडळींना निवेदन दिले आहे.
१९९७ पासुन आजपर्यंत प्रत्येक वर्षी आपण रेल्वे मत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. हा पाठपुरावा करताना गावातील अनेक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रोत्साहन आणि प्रत्यक्ष वेळ देऊन विभागिय रेल्वे व्यवस्थापक, सोलापुर , जनरल मॅनेजर- मुंबई आणि रेल्वे मंत्रालय मुंबई कडे पाठपुरावा केलेला आहे. आदरणीय खासदार. सुप्रियाताई सुळे यांनी तर तत्कालिन केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय ममता दिदि यांना स्पेशल पत्र लिहुन हॉल्ट देण्याची मागणी केली.
वस्तुतः आपल्या भागातील आजुबाजुचा असणारा परिसर आणि रेल्वे प्रवाशांची संख्या पहाता दोन एक्सप्रेस गाड्या सहज चालतील अशी खात्री आहे. त्यामुळे निदान ट्रायल बेसीस वर तरी गाड्यांना थांबा द्यावा अशीही आपली मागणी आहे. परंतु रेल्वे प्रशासन फक्त सुपरफास्ट आणि शहरातील प्रवाशांचाच विचार करताना दिसत आहे. आपल्या कडुनही सरकार अनेक मार्गांनी कर वसुली करते मग ग्रामिणमधील आणि शहरातील लोकामधे फरक का?
यासाठी आता एकजुट होऊन लढायच आहे… सुरुवात शांततेच्या मार्गाने आणि मोर्चा द्वारे निवेदन देऊन करायची आहे. भागातील सर्वच ग्रामपंचायतीचे ठराव संकलन चालुच आहे. सर्वांनी यात सहभागी व्हावे.. सर्व बचत गट, तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे , शाळा, कॉलेज, व्यापारी, शेतकरी, नोकरदार यांनी शनिवार.१८ मार्च २०२३ रोजी सकाळी१० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय केत्तुर येथे एकत्र यायचे आहे आणि तेथुन ११ वाजता आपला मोर्चा हलगीच्या कडकडात रेल्वे स्टेशनवर जाऊन निवेदन देणार आहे. त्या ठिकाणी निवेदन दिलेनंतर छोटीशी सभा होईल. या सर्व कार्यक्रमाला प्रत्येकाने आपला बहुमोल वेळ द्यायचा आहे.
काल परवा मिटींग झाली त्यावेळी उपस्थित राहीलेल्या सर्वांचेच मनापासुन आभार.. त्याचदिवशी जेऊरला खासदार. निंबाळकर साहेबांची भेट झाली, त्यावेळी कार्याध्यक्ष उदयसिंह मोरे पाटील, लक्ष्मीकांत पाटील, उदय पाटील, अजित विघ्ने यांनी खासदार साहेबांची तात्काळ भेट घेतली आणि त्याप्रसंगी सहा महीने दया मी पारेवाडी स्टेशनची मागणी पुर्ण करतो असे आश्वासित केले आहेच. तसेच सोलापुर येथे रेल्वे राज्य मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचे भेटीचा योग आला..
माजी खासदार. सुभाष बापु देशमुख यांचे सहकार्याने मान. सुर्यकांत भाऊ पाटील, राजेंद्रसिंह ऊर्फ अशोक पाटील, लक्ष्मीकांत पाटील, उदय पाटील, चेअरमन दत्तात्रय कोकणे, राजुशेठ कटारिया, अजित विघ्ने, संजय गोरे( सोलापुर) आदींनी प्रत्यक्ष निवेदन देऊन एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. त्यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. तरी देखिल आपणास १८ मार्च चा एल्गार- मोर्चा काढायचा असुन, प्रत्येकानेच आपला बहुमोल वेळ द्यावा असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.