शिक्षकदिनानिमित्ताने नगरपरिषद शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण ; जेष्ठ साहित्यिक राजेंद्र दास यांच्या हस्ते वितरण
समाचार टीम –
नगर परिषद शिक्षण मंडळ करमाळा यांचे वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात आयोजित व्याख्यानात – ” शिक्षण व शिक्षक – काल,आज, आणि उद्या “या विषयावर बोलताना म्हणाले की कोरोनाच्या कालावधीत संपूर्ण भारतात एकीकडे आजाराने भीतीचे वातावरण असताना शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत,कोरोना कर्तव्य बजावत शैक्षणिक जबाबदारी स्वीकारून त्याही कठीण परस्थितीत आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापनाचे काम करून शिक्षण प्रक्रिया वाचवली.

पूर्वी शैक्षणिक क्षेत्रात भौतिक सुविधांचा अभाव होता,आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक सुविधा उपलब्ध आहेत त्याचा वापर करून आपल्या विद्यार्थ्यांना उद्याची शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवावे असे आवाहन उपस्थित शिक्षकांना केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी मा.बालाजी लोंढे साहेब होते तर प्रमुख उपस्थितीत एल.आय.सी.विकास अधिकारी रविंद्र लोंढे साहेब होते.

न.प.शिक्षण मंडळाच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांमधून सौ.सुनंदा जाधव (मुख्याध्यापिका), श्री.नवनाथ पारेकर (सहशिक्षक), श्री.रमेश नामदे (सहशिक्षक), सौ.लता उबाळे (सहशिक्षिका), श्री. दिपक जाधव (सहशिक्षक), श्रीम.कौसर बेगम सय्यद (सहशिक्षिका), श्री.आनंद पाटील (सहशिक्षक) या सर्वांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रशासन अधिकारी माननीय अनिल बनसोडे साहेब यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले व उर्वरित. सर्व शिक्षक देखील उत्कृष्ट, आदर्श आहेत असे मत व्यक्त करून शिक्षक दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे व इतर शिक्षकांचे अभिनंदन केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण मंडळाचे केंद्र समन्वयक मा.दयानंद चौधरी सर यांनी केले.सूत्र संचालन श्रीम.संध्या शिंदे मॅडम यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापक श्री विक्रम राऊत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशा अभंगराव,वैशाली जगताप,प्रज्ञा जोशी,सुषमा केवडकर,अश्विनी ठाकरे,सुनिता शितोळे,मंगल गलांडे,धनश्री उपळेकर,सुरेखा कांबळे, सुनिल जाधव,लालासाहेब शेरे,अशोक ढाकणे,श्रीमंत हांगे,शिवाजी खाडे,मच्छिंद्र गोदडे,बाळू दुधे,मुकुंद मुसळे,भालचंद्र निमगिरे,निलेश धर्माधिकारी,जुबेर जनवाडकर यांनी परिश्रम घेतले.