E-Paperताज्या घडामोडीसकारात्मकसोलापूर जिल्हा

शुल्क नियामक प्राधिकरणाने ठरवलेल्या शुल्का व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क विद्यार्थ्यांकडे घेता येत

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

महाराष्ट्रातील कोणत्याही खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयात व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या किंवा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाविद्यालयांनी शुल्क नियामक प्राधिकरणाने ठरवलेल्या शुल्का व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क विद्यार्थ्यांकडे घेता येत नाही. तसे घेतल्यास विद्यार्थ्यांनी प्राधिकरणाकडे संपर्क साधावा अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्राधिकरण सचिव, डॉ. माणीक गुरसळ यांच्यावतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र खाजगी विनाअनुदानित व्यावसायिक संस्था अधिनियम 2015 नवे शुल्क नियामक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कायद्याअंतर्गत इंजिनीअरिंग, फार्मसी (एम फार्म/ बी फार्म/ डी फार्म) हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, पॉलिटेक्निक तसेच वैद्यकीय सुपर स्पेशलिटी कोर्सेस, वैद्यकीय नर्सिंग (एम. एस्सी/ बी. एस्सी/ पी.बी. एस्सी) होमिओपॅथीक, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, विधी (तीन वर्ष) विधी (पाच वर्ष) इतर अनेक अभ्यासक्रम येतात. अभ्यासक्रम चालवणाऱ्या सर्व खाजगी विना अनुदानित महाविद्यालयांनी आपले प्रस्ताव प्राधिकरणाकडे वेळेत प्रस्तुत करणे बंधनकारक आहे. प्राधिकरण त्याची छाननी केल्यानंतर त्या प्रस्तावाला मान्यता देते. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना किती फी आकारावी याची माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.

शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस याची माहिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरून घ्यावी किंवा त्याकरिता शुल्क नियामक प्राधिकरणाची संपर्क साधावा. महाविद्यालयांना या मान्यताप्राप्त शुल्का व्यतिरिक्त कोणतेही जादा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेता येत नाही. तसेच ॲडमिशन फी, लायब्ररी फी , स्टेशनरी फी , जिमखाना फी , गॅदरींग फी इत्यादी कोणत्याही नावाने शुल्क आकारता येत नाही. असे कोणतेही शुल्क घेतलेले आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्याची माहिती प्राधिकरणास द्यावी असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे पहिल्या वर्षी जे शुल्क निर्धारित केले जाते, एवढेच शुल्क कोर्स संपेपर्यंत लागून राहते. विद्यार्थ्याने पुढच्या वर्षात जादा शुल्क ही देऊ नये.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE