७० किमीपर्यत सीसीटीव्ही तपासत पोलिस पोहचले आरोपी पर्यत
समाचार टीम
करमाळा पो ठाणे गु र न 651-22 ipc 379
करमाळा पोलीस ठाणे येथील जिंती दूर क्षेत्र येथे 2 सप्टेबर 2022 च्या रात्री वाशिंबे गावातून एका शेतकऱ्याने दोन टेलर चोरीस गेले होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी शेतीचे अवजारे चोरी जातील की काय याच्या भयाखाली राहत होते. पण संबंधित चोरीचा छडा लावत ट्रॅली माघारी आणल्या पण दुर्दैवाने आरोपीनी पसार झाले आहेत त्यांचा शोध सुरु आहे.

करमाळा पोलीस ठाणे जिंती दूरक्षेत्र चे अधिकारी सपोनी सागर कुंजीर, तपास अधिकारी पो ना चौधरी तसेच इतर अंमलदार यांनी सदर गुन्हाच्या छडा लावण्याचे आव्हान स्वीकारले. गणपतीसारखा महत्त्वाचा बंदोबस्त असताना देखील अहोरात्र मेहनत घेऊन जवळपास 70 किलोमीटरचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून, मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून व इतर गोपनीय सूत्रे कार्यान्वित करून अखेर चोरीस गेलेले टेलर फलटण येथील गुणवरे या गावातून काल रोजी स्थानिक पोलीस च्या मदतीने हस्तगत केले. चोरी केलेले आरोपी हे पोलिसांस पाहून फरार झाले.

त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. सदरची कामगिरीही माननीय पोलीस अधीक्षक सातपुते, माननीय अपर पोलीस अधीक्षक हिमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या देखरेखीखाली करमाळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे मार्गदर्शनाने जिंती दुरुक्षेत्र चे अधिकारी सपोनी सागर कुंजीर पो ना प्रदीप चौधरी, पोलीस हवालदार श्रीकांत हराळे, पोलीस हवालदार ललित शिंदे , पोलीस शिपाई जालिंदर गोरे, पोलीस शिपाई नितीन चव्हाण, समीर खैरे यांनी केले सदर बाबत जिंती दूर क्षेत्र येथील ग्रामस्थ यांच्याकडून तपास पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.