करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

मोटारसायकल चोरीचा चोवीस तासात छ्डा ; निमगावातील एकास अटक

समाचार टीम

मच्छीमारी करण्यासाठी गेल्यानंतर सीना नदीच्या कडेला लावलेली मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. सदर मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत संबंधित चोराला मोटरसायकल सहित पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरचा प्रकार १५ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या दरम्यान सीना नदी च्या कडेला निमगाव (ह) येथे झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, मच्छीमार गणेश बंडू भोई (वय २५) रा. निमगाव (ह) हे निमगाव हद्दीतील सीना नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी जात असतात. त्यांनी मोटरसायकल (क्रमांक एम एच ४५ ए पी ७४६४) मोटरसायकल ही सीना नदीच्या कडेला निमगाव परिसरात लावली व सकाळी सहाच्या सुमारास मासे पकडण्याकरिता नदीपात्रात गेले होते. माघारी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान आल्यानंतर पाहिले असता सदर मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी संमतीशिवात चोरून नेली आहे. परिसरात शोधाशोध केली परंतु मिळून न आल्याने या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तात्काळ पोलिसांनी दखल घेत माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी माहिती माहितीदाराने संबंधित क्रमांकाची मोटरसायकल समाधान हरिदास निळ (वय २९) निमगाव याच्याकडे मिळून आली. मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे नीळ यास ताब्यात घेतले आहे. सदरचा तपास पोलिस नाईक बालाजी घोरपडे व हवालदार अझर शेख यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE