सोलापुरच्या पालकमंत्रीपदावर भाजपाचा दावा ; आगामी काळात मोहिते, देशमुख की राऊत ?
समाचार टीम
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कालावधीत तीन, सत्तांतरानंतर आता भाजप शिवसेना सरकारच्या काळात सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा इतर जिल्ह्यातील मंत्र्याकडे सोपवण्यात आले आहे. तीन वर्षांमध्ये चौथे पालकमंत्री ही सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे देण्यात आले आहेत.


महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोलापूरच्या पालकमंत्रीची धुरा सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार, दोन खासदार आहेत. तरीही एकालाही मंत्री पद देण्यात आलेले नाही. तर राष्ट्रवादीचे तीन आमदार असतानाही जिल्ह्याच्या बाहेरील मंत्राकडे पालकमंत्री पद सोपवले होते.
सध्या मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसल्याने एका मंत्राकडे एकापेक्षा जास्त जिल्हे आल्याने सदरचा कारभार हा तात्पुरता स्वरूपाचा असल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी मात्र प्रत्येक नेत्याला एक जिल्हा राहील अशी शक्यता आहे. त्यानुसार अहमदनगर हे विख्येंकडेच राहिल तर सोलापूर जिल्ह्यालाही पुन्हा एकदा नवे पालकमंत्री मिळू शकतात.
सदरचे मंत्रीपद हे भाजपच्या कोट्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाल्यानंतर एक गोष्ट तर निश्चित झाली आहे की सोलापूरचे पालकमंत्री पद हे भाजपसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना या ठिकाणी संधी मिळणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपच्याच गटातून नेमके कोणाला मंत्रीपद मिळेल याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याला सदरचे पालकमंत्री पद मिळू शकते.
जिल्ह्यात चर्चेत असलेले चेहऱ्यांच्या मंत्रीबाबत आढावा घेतल्यानंतर मोहिते पाटलांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसुन येत आहे. ग्रामीण सोलापूर जिल्ह्याची मोहितेंना अधिक जवळीक आहे. शिवाय मराठा चेहरा असुन लिंगायत समाजाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्यानंतर आता जिल्ह्यात मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणुन आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, जेष्ठ नेते सुभाष देशमुख, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अशा नावांची चर्चा होऊ शकते. याशिवाय दुसरे जेष्ठ नेते आ. विजयकुमार देशमुख पण चर्चेत आहेत. पण ते लिंगायत समाजाचे असुन जिल्हाध्यक्ष कल्याणशेट्टी यांना जबाबदारी दिल्यानंतर आता मराठा चेहरा समोर येण्याची दाट शक्यता असल्याने मोहितेंचे नाव आघाडीवर असण्याची शक्यता आहे. का या सर्वांच्या रेट्यामुळे पुन्हा एकदा मंत्रीपद बाहेरच जाईल याकडे लक्ष राहिल.
सुरुवातीला पालकमंत्री पद हे परंडा चे आमदार आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना द्यावे अशी मागणी देखील भाजपाचे खा . रणजीतसिंह निंबाळकर यांनी करमाळा दौऱ्यावर आले असताना केली होती. त्यामुळे त्यांना पालकमंत्री मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्या नावाची चर्चा ही सुरू होती. परंतु तात्पुरत्या स्वरूपात झालेल्या पालकमंत्री पदांवर शिंदे गटाला न मिळता भाजपाला मुळाले आहे शिवाय तात्पुरता स्वरुपात दिलेल्या जबाबदारीत सावंत यांना उस्मानाबाद (धाराशिव) व परभणी जिल्ह्यांची जबाबदारी दिल्याने येणाऱ्या काळात सोलापूरसाठी त्यांचे नाव चर्चेतही नसल्याचे दिसुन येत आहे.