करमाळासोलापूर जिल्हा

कृषीपंप विज धोरण 2020″ सवलत योजनेचा  खडकी तून प्रारंभ : शेतक-यांचा प्रतिसाद 

करमाळा समाचार 

“कृषी  पंप विज धोरण 2020” सवलत योजनेचा  खडकी तून प्रारंभ करण्यात आला असून या योजनेला शेतक-यांचा उस्फूर्त  प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी पत्रकारांना दिली आहे.
“कृषीपंप विज धोरण 2020” च्या अनुषंगाने
कृषी वीज बिल सवलत योजना ही अनेक वर्षानंतर आली आहे. या योजनेचा करमाळा तालुक्यातील मौजे खडकी गावातुन सुरवात करण्यात आली आहे.

यावेळी  उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव,  शाखा अभियंता  सुनील पवार  , (शाखाधिकारी करमाळा ग्रामीण २), कैलास लोंढे (  सहाय्यक  लेखापाल करमाळा), श्री गाठे साहेब  , खडकीचे  तारतंंत्री  सुनिल  कामटे ,  तसेच  मनोहर  सांळुके , गणेश क्षीरसागर  श्री अंधारे , श्री शेरे , नितीन पाटील , कृष्णदास कामटे आदि जनमित्र उपस्थित होते.
यावेळी करमाळा तालुक्याचे मकाई कारखान्याचे माजी संचालक व उद्योजक सुभाष शिंदे , खडकीचे सरपंच  बळीराम शिंदे , ग्रामसेवक रंजना उंडे, मोहन शिंदे,  अमोल नलवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जनमित्रानी या योजनेमधील नवीन शेतीपंप वीज सवलतीची ग्राहकांसाठीची चांगल्या प्रकारे  माहिती दिली. यावेळी ग्राहकांनीही संबंधित माहिती समजुन घेऊन त्वरित या योजनेत भाग घेतला . या शेतीपंपाच्या ग्राहकाने  १.९७ लाख रुपयांचा भरणा करून  ७/१२ वीज  बिलापासुन कोरे करुन सहभाग नोंदवला आहे. यामध्ये हिंमत  आण्णासाहेब  शिंदे , विठ्ठल हरी शिंदे  जातेगाव,  शालन सुभाष शिंदे , सुभाष  बापूराव  शिंदे , अमित बापूराव शिंदे यांचा समावेश आहे.  यावेळी  ईश्वर खरात, संदीप वाघमारे, भरत मिरगे आदि मान्यवर ग्राहक व ग्रामस्थ  उपस्थित होते. यावेळी सर्व ग्राहकानी या फायदेशीर योजनेचा  लाभ घ्यावा असे आवाहन  महावितरण कंपनीतील अधिकारी उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव  यांनी केले.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE