करमाळासोलापूर जिल्हा

जिंतीत फुल पीच क्रिकेट सामन्याचे उद्घाटन ; पावसाळ्यानंतर पहिल्या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद

समाचार –

आज दि.13 जिंती येथे श्रीमंत शहाजीराव उमाजीराव राजेभोसले यांच्या वाढदिवसानिमित्त राजेभोसले फाऊंडेशन आयोजित श्रीमंत मकाई चषक 2022 भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समारंभ आदरणीय सवितादेवी शहाजीराव राजेभोसले यांच्या सन्मानिय उपस्थितीत श्रीमंत शिवाजी राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीमंत मकाई समाधीला पुष्प अभिवादन करून हालगीच्या जंगी स्वागतात ग्रामस्थांच्या सन्मानिय उपस्थितीत युवकांचे आशास्थान नेतृत्व ॲड. पृथ्वीराज शहाजीराव राजेभोसले यांच्या प्रेरणेने दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिंती गावातील जेष्ठ नागरिक मकाई क्रिकेट क्लबचे जुने नवे सहकारी राजेभोसले परिवाराचे कट्टर तरूण सहकारी मित्र ग्रामस्थ एक कुटुंब म्हणून उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE