करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

श्री आदिनाथ साखर कारखान सुरु होण्याच्या दिशेने पहिले पाऊल ; कामगारांना हजर करुन घेण्याचा निर्णय – न्यायालयाच्या निकालानंतर मार्ग मोकळा !

प्रतिनिधी सुनिल भोसले


औद्योगिक न्यायालय सोलापूर यांच्या आदेशावरून दिनांक 19 /8/ 2020 च्या निकालानुसार आदिनाथ साखर कारखान्यातील प्रशासनाला झालेल्या कोर्ट निकालानुसार कारखान्या मधील सर्व कायम कामगारांना पत्र क्रमांक जावक क्रमांक आस सा/ प्रशासन/ 1135/ 20 2021 नुसार आदिनाथ सहकारी कारखान्याने परिपत्रक काढून दिनांक 1/9/2020 पासून सर्व खातेप्रमुख विभागप्रमुख व कामगारांना कामावर हजर राहण्याचे परिपत्रक दिनांक 27/8/2020 रोजी कारखाना साईटवरील नोटीस बोर्डावर लावण्यात आले आहे अशी माहिती कामगार महादेव मस्के यांनी ‌करमाळा समाचारशी बोलताना दिली.

पुढे बोलताना मस्के म्हणाले, यानिर्णयामुळे आदिनाथ कारखान्यातील कामगार वर्गास आनंद झालेला आहे. अखेर सर्व बाजूंनी लढा उभा करून थकित पगारी मिळाव्यात म्हणून अनेक आंदोलने उपोषणे केली यामध्ये वेळोवेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे उभे राहिले. त्याच्या नेतृत्वाखाली आंदोलन उपोषणे केली म्हणूनच न्यायालयाने आमच्या मागण्या मान्य करून न्याय मिळवून दिला. ओद्योगिक न्यायालय सोलापूर या न्यायालयाने कामगारांच्या बाजुने योग्य न्याय देऊन परिपत्रक काढले. त्यामध्ये कोर्ट कमिशन नेमुन कामगारांना पगारापोटी प्रत्येक पोत्याला 150 रुपये व मागील 56 पगारातुन कामगारांना चालू करून थकित पगारातील 2000 महिन्याला देणे तसेच निकालत म्हटले आहे. निकाल तारखेपासून 15 दिवसांच्या आत कारखाना चालू करावा तसेच क्रिमिनल केस मधून आदिनाथ कारखान्याने नाना साखरे, विजय शिंदे, महादेव मस्के, युवा टकले, सुभाष करे या पाच कामगारांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले म्हणून या निकालामुळे कामगारांच्या चेह-यावर आनंद निर्माण झाला अशी माहीती महादेव मस्के यांनी दिली. तर आम्हाला शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथआण्णा कांबळे व पत्रकार बांधवाचे सहकार्य लाभले.

सदरचा निर्णय कामगारांना मान्य असुन लवकरात लवकर कारखाना सुरु करुन कारखाना संचालक मंडळाने योग्य ती साधनसामग्री कामगारांना पुरवावी. व कामाला लागावे. मुळात कामगारांना कारखाना बंद पडावा असे काही वाटत नाही. कारखाना चालु रहावा यासाठी त्यांचे मनोमन इच्छा आहे.
दशरथ कांबळे, कामगार संघर्ष समीती.

निकालामुळे नाहीतर संचालक मंडळ व कामगारांची इच्छा आहे की कारखाना सुरळीत चालावा. काही कारणामुळे कामगारांसोबत एकमत होत नव्हते. आता पुन्हा सर्वाना कामावर घेऊन कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगारानीही कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर कामे उरकावीत. इथुन पुढे कामगारांच्या पगारी महिण्याच्या महिण्याला होतील. 
– धनंजय डोंगरे,
चेअरमन, श्री. अदिनाथ सह. साखर कारखाना.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE