करमाळासोलापूर जिल्हा

खाजगीकरणा विरोधात महावितरणच्या 85 हजार कर्मचाऱ्यांचा 72 तासांचा बंद ; वीज गेली तर पुन्हा येणार नाही !

करमाळा समाचार

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियान ते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने जनतेच्या मालकीची वीज उद्योग वाचवण्याकरता 72 तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे दि. ४ रात्री बारापासून लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. संपूर्ण कर्मचारी वर्ग हा बंदमध्ये सहभागी असल्याने अडचणी आल्यास दुरुस्ती करण्यास व वीज बंद झाल्यास पुन्हा चालू करण्यास कोणताही कर्मचारी नसणार आहे.

त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. यातून तोडगा न निघाल्यास 18 जानेवारी 2023 पासून बेमुदत संप करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महाराष्ट्रातून 29 संघटनांनी हा बंद पुकारला आहे. त्यामध्ये 85 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत.

महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरण मध्ये आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नका, कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा, तिनही कंपन्यातील रिक्त जागा भरा, एम्प्लॉयमेंट पद्धतीने कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्र कंपनीमार्फत चालवा व उपकेंद्रांमध्ये कायमच्या कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा या प्रमुख मागण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे.

यामध्ये एकूण 85 हजार कर्मचारी सहभागी झाल्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी कर्मचारी येणार नाहीत. त्यामुळे अडचणी आल्यास केवळ काही ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे नियोजन आहे. पण तेही करमाळा तालुक्यासह बार्शी येथील एकमेव नियत्रण कक्ष असणार आहे. तिथे कार्यकारी अभियंता अडचणी समजुन मदत करतील.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE