कोण रोहित पवार ? – आ. प्रणिती शिंदे यांनी उडवली खिल्ली ; पवारांच्या उत्तराकडे लक्ष
करमाळा समाचार
काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार हे सोलापूर येथे आलेले असताना त्यांनी सोलापूर येथील लोकसभेच्या जागेवरून कार्यकर्त्यांशी बोलताना काही वक्तव्य केली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी आमदार प्रणिती शिंदे यांना विचारले असता. शिंदे यांनी रोहित पवारांची खिल्ली उडवण्याची दिसुन आले. तर त्यांच्यात अजून पोरकटपणा आहे असेही त्या म्हणाल्या. यावरून काँग्रेस व राष्ट्रवादी सध्या शाब्दिक युद्ध पेटले असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अजून दूर आहे. पण, सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच शाब्दिक युद्ध पेटले आहे. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो” असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत उत्तर दिलं.
काय म्हणाले होते रोहित पवार?
“लोकसभा सीट कोणी लढवायाची या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक येत्या महिन्या दोन महिन्यात होईल असा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल” असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं होतं.