करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पाव टीएमसी वाचवण्यासाठी अब्जावधी रुपयांचे नुकसान ; शेतकऱ्यांनी आकडेवारीसह दिला हिशोब

करमाळा – विशाल घोलप

उजनी जलाशयांवरील शेतीपंपाची वीज दोन तासाने कमी करून केवळ पाव टीएमसी पाणी वाचवणार आहे. पण या दोन तासामुळे एकरी दीड लाख रुपयांचे नुकसान लागणार आहे. यामुळे साधारणपणे अब्जावधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात आठ तास व सोलापूर जिल्ह्यात केवळ सहा तास वीज देऊन या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे अशी कैफियत आज शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे मांडली यावेळी जिल्हाधिकारी यांच्यापर्यत आपली भुमीका पोहचवली जाईल असे आश्वासन ठोकडे यांनी दिले.

उजनी जलाशय काठावर करमाळा, माढा, कर्जत, इंदापूर व दौंड या तालुक्यांमध्ये पिके उभे केले आहेत. याबाबत जलसंपदा खात्याच्या माहितीनुसार दररोज ०.५० टीएमसी पाणी म्हणजेच महिन्याचे १.६५ टीएमसी पाणी कमी होते, हे पाणी फक्त जलाशयावरील सिंचनाने कमी होत नाही तर बाष्पीभवन पिण्याची पाणीपुरवठा योजना उद्योगधंदे या चार घटकांसाठी कमी होते. म्हणजेच सिंचनासाठी केवळ ०.५० टीएमसी पाणी रोजचे लागत आहे. यातून दोन तासाच्या वीज कपातीने शासन केवळ ०.१२५ टीएमसी म्हणजेच एकूण तीन महिन्यांसाठी ०.३७५ टीएमसी एवढी पाण्याची बचत करणार आहे. जवळपास पाव ते अर्धा टीएमसी पाणी वाचून दीड लाख एकर वरील सर्व पिके उध्वस्त होणार आहेत. यामध्ये अब्जो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे अशी बाजू आज शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यासमोर मांडली.

सदरची वीज ही पूर्ववत केली नाही तर परिसरातील शेतकरी हे मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात आज तहसीलदार यांची भेट घेऊन सर्व प्रकरण समोर मांडले. शिवाय एक गट जिल्हाधिकारी यांनाही भेटून आला आहे. आज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेती पंपाची वीज कायमस्वरूपीपूर्वक न केल्यास आम्ही कसलेही परिस्थितीत व कोणत्याही निवडणुकीला मतदान करणार नाही असे जाहीर केले आहे. यावेळी कुगाव, केडगाव, चिखलठाण क्रमांक एक, चिखलठाण क्रमांक दोन व शेटफळ येथील शेतकरी उपस्थित होते.

६५ एकरचा त्याग ..
आमचे ६५ एकर क्षेत्र हे उजनी जलाशयासाठी संपादीत केलेय. हा त्याग आम्ही पाण्यासाठी केला होता. येवढा त्याग केलेला असताना जलाशय काठावर असलेल्या पाच एकर क्षेत्र हे हक्काने भिजवु शकत नाही ही शोकांतीका आहे. तरी अशा त्याग करणाऱ्या लोकांसाठी शासनाने विचारपुर्वक निर्णय घ्यावा व आठ तास वीज पुरवठा अखंडीत चालु ठेवावा.
– भारत साळुंखे, शेतकरी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE