मकाई निवडणुक – बागल यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे ; करमाळा समाचार पाठपुरावा
करमाळा समाचार
मकाई कारखाना निवडणूक सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. विरोधक कधी बागल गटावर तर कधी आदिनाथ प्रशासकावर आरोप करताना कोणतीही संधी सोडत नाहीत अशातच नुकतीच काल छाननीच्या वेळी दाखल केलेले हरकतीमध्ये बागल गटाने घोळ घालत आदिनाथच्या पत्रावर मकाईचा शिक्का असलेले पत्र दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता व त्याच्या प्रकारची झेरॉक्स (डुब्लीकेट प्रत) सोशल माध्यमातून फिरताना दिसत होती. परंतु ती सर्व झेरॉक्स ही खोटे असल्याची माहिती समोर येत असून याचा उलगडा छाननीच्या सुनावणी वर होणाऱ्या निकाला दिवशीच होईल असे दिसून येत आहे.
छाननीच्या सुनावणी झाल्यानंतर लागलीच एक पत्र सोशल माध्यमातून जोरदार व्हायरल होत होते. तर या प्रकारे विरोधकांनी ही आपली पत्र तपासणी व त्यांच्याही पत्रावर तशाच पद्धतीचे सही असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु या संदर्भात करमाळा समाचार ने अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सदरची माहिती धंदात खोटे असून सदरचे पत्र हे अर्धेपान होते. तर ज्या पत्रावर मकाईचा शिक्का आहे ते पत्र पूर्ण पानावर असल्याचे दिसून येते. मुळातच बाकी असलेली पत्र हे अर्ध्या पानावरच सहि व शिक्का असल्याने त्याचा पुरावा प्रशासनाकडे उपलब्ध आहे.
त्या पत्रांच्या आधारावर बागल गट बंगल्यात बसून अशा प्रकारची खेळी करत आहे, तालुक्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलेले आहे असे वेगवेगळे आरोप करत असताना आदिनाथ कारखान्यावर प्रशासक असतानाही कर्मचारी हे बागलांचे ऐकून काम करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येत होता. परंतु हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सध्यातरी उघड होत आहे.
अद्याप याबाबत अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने होऊ शकते. परंतु सध्या तरी आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सर्व पत्र सोशल माध्यमातून फिरत आहेत ते धांदात खोटे असल्याचे दिसून येत आहे. जर याबाबत कोणाकडे खऱ्या पत्रांसोबत काही पुरावे असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवले तरी ते आम्ही प्रकाशात आणु परंतु आत्ता आम्ही योग्य माहीती आपणासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.