करमाळासोलापूर जिल्हा

अतिवृष्टीमुळे पिकांचे व घरांचे नुकसानीचे पंचनामे करा – किरण पाटील

करमाळा समाचार – 

करमाळा तालुक्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच खेडेगावांमध्ये घरांची पडझड देखील झाली आहे. काही ठिकाणी शेतकर्यांची जनावरे दगावली व पाण्यांत वाहून गेली आहेत तसेच शेतकर्यांच्या जमीनी देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

तसेच ढगफुटी झाल्यामुळें बंधारे,कँनॉल,चार्या फुटल्याने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. तरी कर्तव्यदक्ष तहसिलदार -समिर माने साहेब यांनी त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश महसुल कर्मचार्यांना देऊन त्वरीत नुकसानग्रस्त शेतकर्यांना व खेडेगावातील घराची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE