मकाईच्या सुनावणीवर निकाल दि ४ रोजी पर्यत अपेक्षीत
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेतल्यानंतर अपात्र झालेल्या २१ अर्जावर प्रादेशिक सहसंचालक सोलापूर येथे राजेंद्रकुमार दराडे यांच्याकडे सोमवारी सर्व अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी विरोधी गटातील प्रमुख नेते जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले व दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ हे सोलापूर येथे पोहोचले गेले होते. त्यावर आता दि ४ पर्यत निर्णय येण्याची शक्यता दराडे यांनी बोलुन दाखवली आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तब्बल ७५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ३६ अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले होते. त्यामध्ये राजेभोसले व झोळ यांच्यासह मातब्बर उमेदवारांचा अर्ज हा बाद झाला होता. त्यामुळे सर्वांनी मिळून दाद मागण्याचे ठरवले, त्यानुसार छाननीच्या तीन दिवसाच्या आत त्यातील २१ अर्जांवर तक्रारी करण्यात आल्या.

त्यावर सोमवारी सुनावणी झाली आहे. सदरची सुनावणीत विरोधकांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ॲड. मंदर्गी, ॲड. घोडके, ॲड. साळुंखे हे काम पाहिले. सदरच्या सुनावणीवर तक्रारी अर्जा नंतर दहा दिवसांच्या कालावधीमध्ये निकाल येणे अपेक्षित असल्याने निकाल दि ४ पर्यत केव्हाही लागेल असे सांगण्यात आले आहे.