करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

BREAKING NEWS – पत्नी व मुलाचा खुन करुन शिक्षकाची आत्महत्या

करमाळा समाचार :


बार्शीमधील नाईकवाडी प्लॉट मध्ये आपल्या राहत्या घरी करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अतुल मुंढे, वय अंदाजे 38 वर्षे, रा. कळंबवाडी, ता. बार्शी, हल्ली रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी यांनी पत्नी तृप्ती ( शिक्षिका )वय 35 वर्षे, मुलगा अंदाजे ओम वय 11 वर्षे यांचा खुन करुन स्वतः देखील आत्महत्या केली आहे.

मुंढे हे करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक म्हणुन कार्यरत होते. कायम ते कोणत्यातरी विचारात असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले. सदरची घटना ही बार्शी येथे घडली आहे. या घटनेमुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. सदरील प्रकाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, बार्शी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE