तालुक्याचा दहावी 93.55 टक्के निकाल ; 54 विद्यालयातुन 14 विद्यालयाचा 100 टक्के निकाल
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील एकूण 54 माध्यमिक विद्यालयातून 3211 पात्र विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यामधून 3004 विद्यार्थी पास होऊन करमाळा तालुक्याचा एकूण निकाल 93.55% लागला आहे. यामध्ये 14 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल लावला आहे. तर तालुक्यातील प्रमुख महाविद्यालयांनी ही 90% च्या पुढे निकाल नेत यशस्वी परंपरा चालू ठेवले आहे.

तालुक्यातील मोठ्या शाळांमधील महात्मा गांधी विद्यालयाने 93.26, भारत महाविद्यालय जेऊर यांनी 93.18 तर अण्णासाहेब महाविद्यालयाने 92.11 अशी टक्केवारी मिळवत उज्वल यशाची परंपरा चालूच ठेवली आहे. तर शहरी व ग्रामीण भागातून चांगली कामगिरी करत 14 माध्यमिक विद्यालय यांनी शंभर टक्के गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केले आहे. बऱ्यापैकी शाळातील विद्यार्थी संख्या कमी असल्याने त्या ठिकाणी शंभर टक्के निकाल लागणार अपेक्षितच आहेत. पण ज्या विद्यालयात जास्त विद्यार्थी असून चांगले गुण मिळवले अशा शाळेचेही कौतुक होत आहे.

राजेश्वर विद्यालय राजुरी, नामदेवराव जगताप विद्यालय झरे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय जातेगाव, नूतन माध्यमिक विद्यालय केम, धर्मवीर संभाजीराजे विद्यालय गौंडरे, छत्रपती संभाजी राजे निंभोरे, गिरधरदास देवी करमाळा, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी, दत्तकला आयडियल केतुर, अभिनव माध्यमिक वाशिंबे, नवभारत इंग्लिश स्कूल, नोबल इंग्लिश स्कूल, डीजी पाटील करमाळा व गुरुकुल माध्यमिक विद्यालय पांडे, तालुका करमाळा असे या 14 विद्यालयाने शंभर टक्के गुण मिळवले आहेत.