करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

करमाळ्यात मुख्याधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष ; संघर्षात भाजपाची उडी

करमाळा समाचार

करमाळा बंदचे आवाहन केल्यानंतरही विविध संघटना या बंद मध्ये सहभागी झाल्या नाहीत. तर किराणा वगळता इतर दुकानांनी विरोध केल्यानंतर दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. तर नगरपरिषदेच्या वतीने गावातील मुख्य रस्ते बंद करून एक प्रकारे बंद वाल्यांना समर्थन देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसून आल्यानंतर शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले व हा प्रकार धुडकावून लावत रस्त्यावर आडवे लावलेले पत्रे अखेर नगरपरिषदेला काढावे लागले.

सुरुवातीला सिद्धार्थनगर परिसरात एक रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण सिद्धार्थनगर कंटेनमेंट झोन जाहीर करणारी नगरपालिका काही दिवसांनी मात्र शिथील होऊन कंटेनमेंट करणे बंद केले होते. तर बाधित आढळलेल्या परिसरात कंटेनमेंट करणे तर लांबच संबंधित व्यक्तीच्या दुकानदारीला ही विरोध करण्यात आला नव्हता असे असताना काल किराणा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानंतर इतर व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली. त्यावेळी मात्र नगरपरिषदेने शहरातील मुख्य रस्ते पत्रे ठोकून बंद करण्यास सुरुवात केला. यावेळी राशिन पेठ, सुभाष चौक व परिसरातील व्यापारी व भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, दीपक चव्हाण, चंद्रकांत राखुंडे यांच्यासह सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी विरोध दर्शवायला सुरुवात केली.

तब्बल तीन ते चार तास हा संघर्ष सुरू होता. काही वेळातच त्या ठिकाणी स्वतः खासदार साहेब येऊनच सदर प्रकरणात लक्ष घालतील असा इशारा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिला व त्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने लावण्यात आलेले बॅरिकेट पुन्हा काढून घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी विना पवार यांनी दिल्या यातून गावात सततचा बंद व रस्त्यावर होणारी चुकीच्या पद्धतीची बंदी याला व्यापारी व नागरिकांचा किती विरोध आहे हे दिसून आले.

अखेर बंद साठी लावलेले पत्रे काढण्यात आले.
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE