उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशी बागल गटाला आणखीन एकदा दिलासा
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाला आणखीन एक दिलासा मिळताना दिसत आहे. यामध्ये विरोधक मागील संचालक मंडळातील काही सदस्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात तक्रारीसाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांची मंजूर अर्जावर हरकती घेतल्या होत्या. परंतु त्या सर्व हरकती उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने बागल गटाला आणखीन एकदा दिलासा मिळताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी 36 अर्जांवर झालेली सुनावणी जैसे थे ठेवण्याचा निकाल दिल्यानंतर हा दुसरा दिलासा बागल गटाला मिळत आहे.

मागील संचालक मंडळातील काही सदस्य पुन्हा एकदा यंदाच्या निवडणुकीत सामोरे जात आहेत. यावेळी त्यांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर विरोधकांच्या वतीने उच्च न्यायालयात दाद मागण्यात गेले होते. त्यामध्ये उत्तम पांढरे, रामभाऊ हाके, संतोष पाटील यांच्यासह नवनाथ बागल यांच्यावरही आक्षेप घेण्यात आला होता.

आज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी सदर अर्जांवर निकाल हाती लागला आहे. त्यामध्ये सर्व अर्ज हे फेटाळल्यामुळे बागल गटाला मोठा दिलासा मिळत आहे. तर आज अंतिम दिवशी किती अर्ज शिल्लक राहतात यावर निवडणुकीची गणित अवलंबून राहणार आहे. बागल गटाकडून अविरोध साठी प्रयत्न सुरू आहेत. तर विरोधी गटातून निवडणूक लावण्यावर भर आहे. त्यामुळे विरोधी गटाने दावा केलेले पाच उमेदवार त्यांच्या सोबत राहतात का हेही पाहण्याजोगे राहणार आहे. सर्व पाच उमेदवार सोबत राहिल्यास नक्कीच ही निवडणूक होण्याची शक्यता आहे.