ग्रामपंचायत बिनविरोधची ३५ वर्षाची परंपरा कायम ; ग्रामस्थांनी दाखवला विश्वास
जेऊर
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया चालू असताना आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच सात जागांसाठी फक्त सात च उमेदवारी अर्ज दाखल करून समस्त जेऊरवाडी ग्रामस्थांनी महाराष्ट्र केसरी मा सभापती चंद्रहास बापू निमगिरे यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास दाखवत सर्व सहमतीने उमेदवार निवडून ग्रामपंचायत च्या स्थापनेपासून ३५ वर्षांपासून गावाची बिनविरोध ची परंपरा कायम ठेवली आहे.
आज ता ३० डिसेंबर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सात जागांसाठी
जयश्री नवनाथ शिरस्कर
कल्पना सैनिपाल निमगिरे
माया अण्णासाहेब निमगिरे
लता शंकर निमगिरे
तात्यासाहेब विठ्ठल निमगिरे
गोरख रामा निमगिरे
योगेश छगन निमगिरे
या सात अर्ज भरून गावकऱ्यांनी एकीचे व गावपातळीवर चालणारे आपापसातील सहकार्य व विश्वासाचे वातावरण कायम ठेवत यापुढेही महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांच्या नेतृत्वाखाली गावात सुरू असलेल्या विकासकामांना अधिक जोमात सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.