करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बिटरगाव श्री येथे होतोय वाळु अवैध वाळु उपसा ; कारवाईची मागणी

करमाळा समाचार

बिटरगाव श्री शिवारात असलेल्या सिना नदीच्या पात्रातून अनोळखी व्यक्ती वाळू उपसा करीत असल्याने त्याच्यावर कारवाई करायची मागणी स्थानिकातून होत आहे. सदरचा वाळू उपसा हा सलग दिवस न करता लोकांच्या नजरेआडु केला जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

मध्यरात्री उशिरा ट्रॅक्टर व मजुरांच्या साह्याने सीना नदी च्या कोरड्या पात्रातून वाळू उपसा करून अवैधरीत्या पुरवठा केला जात असल्याची तक्रार माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मुरूमकर यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले की, पात्रातून वारंवार वाळू उपसा केला जात असल्याने तेथे मोठा खड्डा पडला आहे. तर लोकांच्या नजरेआडुन संबंधित व्यक्ती हा वाळू चोरी करत आहे. याबाबत प्रशासनाला कळवले तरी यावर कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे यात प्रशासनाचे काही कर्मचारी ही सामील असल्याचे दिसून येते असे मुरुमकर यांचे म्हणणे आहे.

politics

संबंधित ठिकाणी वाळू उपसा होत असल्याची माहिती सर्वच कर्मचाऱ्यांना असतानाही त्याकडे काळा डोळा करत आहे याचा अर्थ यामध्ये ते सहभागी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासन या गोष्टीकडे कशा पद्धतीने लक्ष देईल याकडे लक्ष राहील. तर वाळू माफिया व ग्रामस्थांमध्ये वाद-विवाद होऊ नये म्हणून प्रशासनाने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

परिसरातून वाळू उपसा केला जात आहे. यासंदर्भात काही बोलल्यास उलट दमदाटी केली जाते. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

– दिलीप मुरुमकर, ग्रामस्थ.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE