करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यावरील पाणी संकट वाढण्याची शक्यता ; अडचणीत अडचणी

करमाळा समाचार

मागील पूर्ण उन्हाळाभर पाण्यासाठी करमाळा शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. तर आता हे हाल अधिक वाढताना दिसून येत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असली तरी पाऊस झाला नाही. त्यामुळे धरण मायनस मध्ये गेले असताना वारीच्या नावाखाली पाणीही पुढे सोडण्यात आले आहे. त्यामुळे अधिकच पाणीबाणी करमाळा नागरिकांवर ओढवली गेली आहे.

उजनी जलाशयातून दहिगाव येथून करमाळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. सदरचा पाणीपुरवठा मागील महिनाभरापासून विस्कळीत झाला आहे. यामध्ये तांत्रिक बाबींचा समावेश होता. परंतु आता नवे आव्हान पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणे पुढे उभा राहिले आहे. त्यामुळे येणारा काळ अधिकच अवघड होऊन बसल्याचे शक्यता आहे. पाऊस नसल्यामुळे उजनी धरण मायनस मध्ये गेले आहे. तर ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो त्या चारी पर्यंत पाणी येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे करमाळाकरांच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अवघड होऊन बसली आहे.

तर वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे उजनी धरणातील पाणी सोडल्यामुळे ही परिस्थिती अधिकच खालावल्याची दिसत आहे. त्यामुळे पाऊस न झाल्यास व वरचेवर पाणी सोडतच राहिल्यास करमाळाकरांना जवळपास पंधरा दिवसानंतरच पाणी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. वेळीच योग्य निर्णय घेतल्यास करमाळाकरांचे पाणी संकट ओढवले जाणार नाही याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE