दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यात संधी ; मंजुळेंनी केलय आवाहन
करमाळा समाचार
सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नवा चित्रपट ‘ खाशाबा ‘ कुस्तीवर आधारित येत असून त्यासाठी नुकतेच ऑडिशन घेण्यात येत आहेत. त्यामध्ये युवकांना संधी मिळणार असल्याने ऑडिशन साठी येण्यापूर्वी संबंधित वेबसाईटला भेट द्या असे आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.

यापूर्वीही नागराज मंजुळे यांनी करमाळा असेल किंवा अकलूज सारख्या स्थानिक ठिकाणाहून नवकलाकारांना संधी देत त्यांना मोठ्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. झुंडमध्येही आपण पाहिले असेल की झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलांना सोबत घेऊन चित्रपट बनवला होता. आता नवीन युवा मुलांना तशीच संधी उपलब्ध होत आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत
आटपाट निर्मित
खाशाबा
चित्रपट ऑडिशन
दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे
फक्त मुलांसाठी
वयोगट – ७ ते २५ वर्षे
मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक
पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे)
३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ.
३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ.
फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै
फॉर्म भरण्यासाठी सोबत दिलेल्या URL लिंकचा वापर करा.