भोत्र्यात उसाच्या शेतात सापडले युवकाचे मृत शरीर हाडे आणी कवटी राहिल्याने कपाड्यावरुन तपास सुरु

करमाळा समाचार

अर्धवट हाडांचा सापळा असलेले कवटी बाजूला पडलेली, तर पाठीचे मणके व कंबरेचे हाड दोन्ही पायाचे अर्धवट हाड असलेले शरीर परंडा पोलिसांना मिळाले आहे. संबंधित माहिती त्याच्या शरीरावरील कपडे व बेल्ट च्या आधारावर त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

भोत्रा तालुका परंडा येथील रामेश्वर दत्तात्रय भानवसे यांच्या उसाच्या पिकाच्या शेतात 12 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या पूर्वी एक मृत शरीर मिळवून आले आहे. कवटी व हाडे खाडे मिळाल्याने ओळख पटवणे अवघड झाले आहे. तरी करमाळा, कर्जत, परांडा, जामखेड त्या परिसरात सदर महत्त्वाच्या कपड्यावरून त्याचा शोध घेतला जात आहे.

संबंधित मयताच्या अंगावर निळसर पांढरा रंगाची जीन्स पॅन्ट त्यावर लाल रंगाचा कंपनीचे लेबलवर N MARK असे लिहिले आहे. MADE FOR HAPPINESS असेही लिहिलेले आहे. चॉकलेटी व काळ्या रंगाचा रबरी बेल्ट त्यास स्टीलचे बक्कल त्यावर BIVNSWOLVES असे लिहिले आहे. व पांढरट रंगाचा मळकट असलेला शर्ट त्याच्या अंगावर आहे. या सर्व माहितीच्या आधारावर त्या महत्त्वाचा शोध घेणे सुरू आहे. याबाबत कोणाला कसलीही माहिती मिळाल्यास करमाळा पोलीस ठाणे किंवा परंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परंडा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक 02477-232026

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!