स्वयंम संस्कार केंद्र आयोजित MRTS च्या क्लासला करमाळ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद
करमाळा समाचार
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज ओळखून, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गतीमान करण्याच्या उद्देशाने स्वयंम संस्कार केद्राने महाराष्ट्र रिलय टॅलेंट सर्च ही राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असलेल्या ह्या परीक्षेला करमाळ्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परीक्षेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्याला परीक्षेविषयी व शालेय अभ्यासाचे मार्गदर्शन वर्षभर अगदी मोफत दिले जात आहे.

त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून स्वयंम संस्कार केंद्राचे अध्यक्ष प्रा.उत्तम विटुकडे सर व त्यांच्या अर्धांगिनी केंद्राच्या सचिव प्रा.डॉ.सारीका विटुकडे यांचे संपुर्ण करमाळा शहरातून कौतुक होत आहे. MRTS परीक्षा ही इ. पहिली ते इ.बारावी पर्यतच्या वर्गांसाठी आहे. परिक्षेसाठीचा अभ्यासक्रम NCERT, CBSE, व State Board च्या अभ्यासक्रमांचा मेळसाधत NEET, JEE, MPSC व UPSC यांसारख्या परीक्षेंच्या धरतीवर निर्माण करण्यात आलेला आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम वैशिष्ठ्य पूर्ण असल्याने केंद्राने मोफत मार्गर्शनाचे क्लास सुरु केले आहेत.
करमाळा शहरातून परीक्षेला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचा आकडा वाढत असून आता करमाळा शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही संख्या वाढत आहे. गावो-गावी स्वयंम संस्कार केंद्राचे वर्ग सुरु होणार असून सज्ञ पालकांनी स्वयंम संस्कार केंद्राच्या सर्व उपक्रमांचा लाभ घ्यावा असे अवाहन प्रा.उत्तम विटुकडे सरांनी केले आहे.
