ताज्या घडामोडीपंढरपूरसोलापूर जिल्हा

आता पर्यत तेरावी फेरी पुर्ण ; शहराची मोजणी संपली आता ग्रामीणकडुन भगिरथ यांना आशा

करमाळा समाचार – पंढरपूर

पंढरपूर शहर ची मतमोजणी पूर्ण झाली असून त्यामध्ये आतापर्यंत 1 हजार 59 मतांचा लीड भाजपच्या पारड्यात पडला आहेत. आता पाच फेऱ्या या ग्रामीण भागातल्या बाकी आहेत. तर त्यानंतर मंगळवेढा शहर व तालुक्यातील होणार आहेत. आतापर्यंत तेराव्या फेरीनंतर अवताडे यांना 35 हजार 893 उत्तर भारतीयांना 34800 34 मते मिळाली आहेत.

पंढरपूर शहर मध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर पडल्यानंतर आता मात्र फक्त ग्रामीणच्या पाच फेऱ्या बाकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा निकाल थोडासा अडचणीचा ठरू लागला आहे. यानंतर भाजपा चे उमेदवार समाधान आवताडे ज्या तालुक्यातून प्रतिनिधित्व करतात, त्या म्हणजे मंगळवेढा भागातील मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच अवताडे यांनी लीड मिळवल्यास अगदी एकतर्फी विजय मिळवण्यास मदत होईल. पण अजून राहिलेल्या ग्रामीण भागातील पाच फेऱ्यांमध्ये लक्ष लागून राहिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE