तालुक्यातील जेऊर सह सोळा ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर
करमाळा समाचार
तालुक्यातील रखडलेल्या ग्रामपंचायती व पोटनिवडणुका जाहीर करण्यात आला आहे. याची नुकतीच तारीख जाहीर केली असून 16 तारखेपासून नामनिर्देशन पत्र मागवण्याच्या व सादर करण्याची सुरुवात होणार आहे. तर 20 तारखेपर्यंत याची मुदत राहणार आहे. तर 5 नोव्हेंबर रोजी मतदानाचा दिनांक असणार आहे. त्यामुळे आता करमाळा तालुक्यातील जवळपास 16 ग्रामपंचायत व दोन पोट निवडणूक या कार्यक्रम पद्धतीने होणार आहेत.

करमाळा तालुक्यातील वीट, कंदर, केम, रावगाव, जेऊर यासारख्या प्रमुख गावांच्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. त्याची आता निवडणूक लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वच प्रमुख गावांची या निवडणुका असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्रभरात एकूण सर्व ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 109 ग्रामपंचायत ही निवडणूक होईल. यामध्ये आता विविध गट व पक्षांचा कस लागणार आहे. नेमकं कोण कोणत्या गटात गेल्यामुळे कसा फायदा कोणाला होतोय हे यातून दिसून येणार आहे.