E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

आंदोलनांच्या इशाऱ्यानंतर कुकडीचे पाणी सोडले ; अखेर आंदोलन स्थगीत

कुकडी डाव्या कालव्याला उन्हाळ आवर्तन सोडण्यासाठी दि.२७ मे घारगाव येथील “रस्ता रोको” त्यानंतर होणारी “जेल भरो” व “आत्मदहन” हि टप्पा टप्पाने होणारी सर्व आंदोलन स्थगित झाले आहेत.

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या दि ९ मे च्या बैठकीत २२ मे रोजी उन्हाळी कुकडी आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झालेला असताना. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सर्व पक्षांना बरोबर घेऊन जुन्नर तहसीलदार कार्यालया समोर दि.१४ मे रोजी आंदोलन करून हे आवर्तन ‌ सोडण्यास विरोध केला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा दि.१५ मे दौरा असताना ९मे च्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी प्रत्यक्ष भेटून केली. त्याला फडणवीस व पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सिंचन भवन पुणे येथे मुख्य अभियंता धुमाळ व अधीक्षक अभियंता सांगळे यांना 16 मे रोजी भेटण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके व त्यांचे सर्वपक्षीय, सामाजिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, व काही शेतकरी धुमाळ व सांगळे यांच्या समवेत बैठकीत बसले होते. या बैठकीमध्ये मी जाऊन श्री बेनके यांना तुम्ही जगा, आम्हालाही जगू द्या! आपण आमदार आहात कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका असली पाहिजे हे मत श्री बेनके यांच्यासमोर मी मांडले. तदनंतर काही संघटनांनी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे २२मे रोजी येडगाव आणि पिंपळगाव जोगे या धरण क्षेत्रात आंदोलन करून या आवर्तनाला खोडा घातला.

पुणे जिल्ह्यातील नेते व प्रशासन उन्हाळ्यात ज्यावेळी पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा या तालुक्याला पाण्याचे आवश्यकता असताना असाच खोडा घालुन या तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. कुकडी एकात्मिक प्रकल्पामध्ये ६२ टक्के हिस्सा पारनेर श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांचा असून ३८ टक्के हिस्सा पुणे जिल्ह्याचा आहे. मात्र वरील भागात उर्फाटा कारभारा करून या उलट पुणे जिल्ह्यात या पाण्याचे ६२% पाणी वापर होतो. तर ३८% पाण्यातच अहमदनगर सोलापूर जिल्ह्याचा बोळवण होते. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे अतोनात हाल व आर्थिक नुकसान होते.

उन्हाळी आवर्तनाला उशीर झाला तर श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, करमाळा या तालुक्यात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात कमतरता भासून या विभागातील फळबागा व इतर पिकांचे प्रचंड नुकसान होऊन या भागाची राख रांगोळी होते. त्यामुळे भापकर यांनी तातडीने श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या समोर दि.२३मे रोजी एक दिवशी “लाक्षणिक उपोषण” केले. या उपोषणानंतर त्याच ठिकाणे आंदोलनकर्त्यांनी २५, २६ मे रोजी पाणी सुटले नाही तर २७ मे २०२३ रोजी नगर दौंड महामार्गावरील घारगाव येथे सकाळी ८.०० वा. पासून तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची पूर्ण तयारी झाली होती. मात्र आज २५ मे२०२३ रोजी कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले. त्यामुळे होणारा रस्ता रोको, जेलभरो, प्रसंगी आत्मदहन ही सर्व आंदोलने स्थगित करण्यात येत आहेत.

या कामामध्ये उपमुख्यमंत्री व जल संपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार अंबादास दानवे, मुख्य अभियंता ह.तू. धुमाळ, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता श्री कडुस्कर व श्री काळे या सर्वांचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने व व्यक्तिगत माझ्या वतीने मनःपूर्वक आभार व धन्यवाद तसेच या आंदोलनात आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील आदरणीय नेते व कार्यकर्ते तसेच शेतकरी यांचे धन्यवाद व आभार.

या आंदोलनासाठी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते व सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी म्हणून या आंदोलनाच्या पाठीशी ठाम पणे उभे राहणारे नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र नागवडे, घनश्याम अण्णा शेलार, दत्तात्रय पानसरे, राजेंद्र आबा म्हस्के, नारायण शिंदे, पुरुषोत्तम भैय्या लगड, प्रमोद नाना जगताप, बाळासाहेब नाहटा, अनिल ठवाळ, स्मितल भैया वाबळे, टिळक भोस, नितीन नलगे,विवेक पंदरकर,महेश यादव, शाम बारगुजे, बंडू आबा पदंरकर, शहाजी हिरवे, मयूर पंदरकर, मारुती पारखे,विजय जठार, विठ्ठल शेळके, नितीन भोसले, सुरेश भापकर, सूर्यजीत पवार, विनायक जगताप, बबन पंदरकर, दत्तात्रय इथापे, लक्ष्मण इथापे, सतीश मखरे,बाळासाहेब इथापे, महेश दरेकर, अंकुश रोडे, डॉ. मोरे, नाथाभाऊ शेडगे, दिनेश इथापे, एकनाथ खामकर, खंडू आरू, गणेश इथापे, राहुल शेंडगे, विशाल खरात, जालिंदर पंदरकर, सतीश खरात, बंडू सलगर, किशोर बापू पंदरकर, लक्ष्मण इथापे, शेळके सर,योगेश पारखे, सुरेश खरात, बाळू आण्णा खरात, सुखदेव फराटे, शरद इथापे, विनायक खरात, बाबासाहेब इथापे, ज्ञानदेव भापकर मेजर, बाजीराव इथापे, अंकुश रोडे, डॉ बापू पंदरकर, सचिन भापकर, शुभम, भापकर, तात्यासाहेब देवकाते, संजय पंदरकर, संतोषकाका पंदरकर, प्रतापसर पंदरकर, विठ्ठल वागस्कर, बाबा कैतके, रवीतात्या पंदरकर, रामदास गुरुजी पंदरकर, सुनील क्षीरसागर, अतुल पुराणे मयूर कुताळ, संपत पवारसर, आबा कानगुडे, दिनेश इथापे, अनिल टकले, विनोद टकले, गणेश गावडे, अनिल गावडे, अनिल शिर्के, जितेंद्र पाडळे, सचिन कदम, दत्तात्रय इथापे, भाऊसाहेब नलगे, बापूसाहेब खरात, प्रवीण शिंदे, सुभाष शिर्के, संजय फराटे, बाळुकाका मुरकुटे दादासाहेब पंदरकर सुनील भापकर, अतुल पुराणे, संजय इथापे, वैभव इथापे, निलेश काळे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी या आंदोलनासाठी उपस्थित होते. या सर्वांचे मनापासून धन्यवाद व आभार या पुढील काळातही कुकडी डाव्या कालव्या बाबत श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते सामाजिक संस्था संघटनांचे वकील, इंजिनियर, पाणी तज्ञ, या लढ्यातील जुने जाणते अभ्यासू नेते कार्यकर्ते, युवक युवती यांनी एकत्रित येवून संघटित होवून अभ्यासपूर्ण विषय घेवून आपला बहुमूल्य वेळ देत पुढील काळात रस्त्यावरील व कायदेशीर लढ्याच्या मार्गाचा अवलंब करून प्रदीर्घ संघर्ष करण्याची तयारी ठेवावी. आपला नम्र श्री मारुती भापकर कुकडि कालवा बचाव आंदोलन श्रीगोंदा तालुका.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE